टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. बुधवारी (26 ऑक्टोबर)इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा विसावा सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. आयर्लंडने कर्णधार अँड्र्यू बालबर्नी याच्या अर्धशतकाच्या जोरावर 19.2 षटकांत सर्व विकेट्स गमावत 157 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 14.3 षटकात 5 विकेट्स गमावत 105 धावा केल्या, मात्र पावसामुळे त्यांना हा सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार अवघ्या 5 धावांनी गमवावा लागला.
आयर्लंड पहिल्यांदाच एमसीजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळत होता. अशाच त्यांची टक्कर इंग्लंडशी झाली. पहिला सामना गमावल्याने आयर्लंडला हा सामना जिंकणे आवश्यक होते. तसेच लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली. जोशुआ लिटल याच्या उत्तम कामगिरी केली. त्यानेच जोस बटलर (0) आणि ऍलेक्स हेल्स (7) या दोन विकेट्स घेतल्या. डेविड मलान आणि हॅरी ब्रूक यांनी थोडीफार झुंज दिली. मात्र दोघेही अनुक्रमे 35 आणि 18 धावा करत बाद झाल्याने इंग्लंडचा डाव गडबडला. तरीही त्यांच्याकडे लियाम लिविंगस्टोन बाकी होता, त्यामुळे जिंकण्याच्या थोड्यातरी आशा होत्या पण पावसाने खेळ खराब केला. तेव्हा मोईन अली 200च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. त्याने 12 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार खेचत 24 धावा केल्या, तर लिविंगस्टोन दुसराच चेंडू खेळला होता. तसेच जोशुआ लिटलने 3 षटकात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सुरूवात चांगली करण्याचा प्रयत्न केला, मात्र मार्क वूड याने अनुभवी सलामीवीर पॉल स्टर्लिंग याचा अडसर दूर केला. तेव्हा वाटले आयर्लंड कमी धावसंख्येवर बाद होईल. त्याचक्षणी कर्णधार अँड्र्यू बालबर्नी (Andrew Balbirnie) आणि लॉर्कन टकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. टकर 34 धावा करत रनआऊट झाला. त्यानंतर बालबर्नीने डाव सांभाळत 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 62 धावा केल्या.
VICTORY!
What. A. Performance 👏
SCORE: https://t.co/LUtLhuvQAq#IREvENG #BackingGreen #T20WorldCup ☘️🏏 pic.twitter.com/EXRTaIRlS9
— Cricket Ireland (@cricketireland) October 26, 2022
इंग्लंडकडून मार्क वूड आणि लियाम लिविंगस्टोन यांनी उत्तम कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. लियामने तर 3 षटकात 17 धावाच दिल्या. बालबर्नी हा सामनावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे काय हे, लॉर्कन टकरचे नशीबच फुटके! विचित्र पद्धतीने रनआऊट, व्हिडिओ व्हायरलं
जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा नकोसा विक्रम, टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले कांगारूंसोबत