अायर्लंडचा फलंदाज सीन टेरीने वयाच्या 26 व्या वर्षी मंगळवारी (3 जुलै) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
सीन टेरीने 2016 साली अफगानिस्तान विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आयर्लंडकडून खेळताना 5 एकदिवसीय सामन्यात 32 धावा केल्या आहेत.
तर हॉंगकॉंग विरुद्ध खेळलेल्या एकमेव टी-20 सामन्यात त्याला फक्त चार धावा करता आल्या.
“मी जड अंत:करणाने माझा क्रिकेटमधील प्रवास इथेच थांबवायचे ठरवले आहे. आयर्लंडसाठी क्रिकेट खेळणे आयुष्यातील सन्मानाची गोष्ट होती. आता आयुष्यातील नवीन प्रकरण सुरु करण्याची वेळ आहे. मला संधी आणि पाठींबा दिल्याबद्दल क्रिकेट आयर्लंडमधील सर्वांचे मनापासून आभार.” क्रिकेट आयर्लंडला लिहलेल्या पत्रात सीन टेरी म्हणाला.
सीन टेरीने 2016ला आयर्लंडकडून पदार्पण करण्यापुर्वी तो एका कसोटी सामन्यात इंग्लंडकडून बदली खेळाडू म्हणुन मैदानातही उतरला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2014मध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने क्षेत्ररक्षण केले होते. त्यात भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा त्याने झेल घेतला होता.
टेरीचा जन्म 1 आॅगस्ट 1991 रोजी साउथॅंप्टन य़ेथे झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘बाप योगायोग’- फिफा विश्वचषकात जुळून आलायं अनोखा योगायोग
-धोनीसाठी ५००वा सामना तर विराटला जगातील सर्वात खास विक्रम करण्याची संधी
-भुवनेश्वर-कुलदीप हे वागणं बरं नव्हे; इंग्लंडचा क्रिकेटपटू कडाडला
-पृथ्वी शॉची टीम इंडियाकडून धमाकेदार कामगिरी सुरुच…