क्रिकेटटॉप बातम्या

दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक आयर्लंडच्या पारड्यात, भारता ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रथम…

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे आयर्लंडला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा असेल. 

उभय संघांतील या दुसर्या टी-20 सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल पाहायला मिळाला नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सामनावीर ठरला होता. त्याने चार षटकात 24 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात देखील त्याच्याकडून चाहत्यांना अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. नाणेफेक झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने आपण आता फिट अशल्याचे पुन्हा एकदा सांगितले. तब्बल 11 महिन्यांनंतर बुमराह आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करत आहे. दरम्यानच्या काळात दुखापतीमुळे त्याने एकही सामना खेळला नव्हता.

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी आयर्लंड आणि भारताची प्लेइंग इलेव्हन –
आयर्लंड: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

भारत: यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई. (Ireland have won the toss and they’ve decided to bowl first.)

महत्वाच्या बातम्या –
‘रोहित आणि विराट यांचा टी20 न खेळण्याचा निर्णय अगदी योग्य’, अश्विनचे मोठे वक्तव्य
शास्त्रींच्या सल्ल्यावर अश्विनने उपस्थित केला प्रश्न! म्हणाला, ‘तीन डावखुरे फलंदाज…’

Related Articles