---Advertisement---

ऐतिहासिक कामगिरी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयर्लंडने रचला इतिहास, वनडे मालिकेतही घेतली आघाडी

On: बुधवार, जुलै 14, 2021 9:34 AM
---Advertisement---

आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याचा निकाल लागला नव्हता तर,दुसऱ्या सामन्यात आयर्लंड संघाने मोठा उलटफेर करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मंगळवारी (१३ जुलै) झालेल्या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकन संघाला ४३ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन संघाला २४७ धावाच करण्यात यश आले. आयर्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेतील हा पहिलाच विजय ठरला आहे.

आयर्लंड संघाने गतवर्षी इंग्लंड संघाला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर आता त्यांनी दक्षिण आफ्रिकन संघाला देखील पराभूत केले आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाचा कर्णधार अँडी बालबर्नीने शतक झळकावले. त्याने ११७ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने १०२ धावांची खेळी केली. तर हॅरी टेक्टरने ६८ चेंडुंमध्ये ७९ धावांची खेळी केली. तसेच जॉर्ज डॉकरेलने २३ चेंडूंमध्ये ४५ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळे आयर्लंड संघाने ५० षटकांअखेर ५ बाद २९० धावा केल्या होत्या.

https://twitter.com/ICC/status/1415002219359965193?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1415002219359965193%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fmatch-report-ireland-register-historic-win-against-south-africa-in-odi-captain-andy-balbirnie-hits-century-21828506.html

प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर आयर्लंड संघातील गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला. त्यांनी एकापाठोपाठ एक फलंदाजांना बाद करत दक्षिण आफ्रिकन संघाचा डाव ४८.३ षटकांत केवळ २४७ धावांत संपुष्टात आणला. दक्षिण आफ्रिकन संघाकडून सलामीवीर फलंदाज जानेमन मलानने ९६ चेंडूंमध्ये सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली होती. तर रस्सी वॅन दर दसेनने ४९ धावांचे योगदान दिले. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. (Ireland registered their historic win against South Africa)

आयर्लंड संघाकडून मार्क एडेर, जॉस लिटिल, अँडी मॅकबिर्नीने प्रत्येकी २ गडी बाद केले. तसेच सिमी सिंग, जॉर्ज डॉकरेल आणि क्रेग यंग यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’चा बोयपिक येणार भेटीला; ‘हे’ ६ अभिनेते साकारू शकतात गांगुलीची भूमिका 

काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला

मोठी बातमी! टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---