भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्याला शुक्रवारी (18 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. डब्लिन येथे होणाऱ्या या पहिल्या सामन्यात विजय संपादन करून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघाला नामुष्कीरित्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या संघात कोणताही अनुभवी खेळाडू नसून, 11 महिन्यानंतर पुनरागमन करत असलेला बुमराह कर्णधार आहे. प्रथमच टी20 संघाचे नेतृत्व करत असलेल्या बुमराहवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
डब्लिन येथील व्हिलेज ग्राउंडवर होणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त उपकर्णधार ऋतुराज गायकवाड, वेस्ट इंडीज दौरा गाजवलेले यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा यांच्यासह संजू सॅमसन याच्यावर असेल. तर, गोलंदाजीत कर्णधार बुमराहसह अर्षदीप सिंग व रवी बिश्नोई लक्षवेधी ठरू शकतात.
यजमान संघाचा विचार केल्यास कर्णधार पॉल स्टर्लिंग याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. हॅरी टेक्टर व लॉरकन टकर हे देखील योगदान देऊ शकतात. अष्टपैलू कर्टिस कॅम्फर, फिरकीपटू बेन व्हाईट व वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल हे घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 व जिओ सिनेमा यावरून केले जाईल.
पहिल्या टी20 साठी संभाव्य भारतीय संघ- ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई व मुकेश कुमार,
(Ireland v India First T20I Preview Bumrah Have Challenge As Captain)
महत्वाच्या बातम्या-
गंभीर सोडणार सुपरजायंट्सची साथ? ‘या’ संघाकडून आली ऑफर
मिनी ऑरेंज आयटीएफ मिश्र रिले राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक