भारताचा आयर्लंड येथे पोहोचलेला संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे सोपवले आहे. भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी२० सामना रविवारी (२६ जून) डबलिन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. भारताचे खेळाडू आयर्लंडच्या डबलिन येथे पोहोचताच सरावास सुरूवात केली आहे.
दोन्ही संघांनी या सामन्यांसाठी मैदानामध्ये चांगलाच घाम गाळत कसून सराव केला आहे. यादरम्यान पाऊस आल्याने खेळाडूंनी फुटबॉलचा आनंद घेतला आहे. याचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेयर केले आहेत.
Snapshots from #TeamIndia's training session at the Malahide Cricket Club, Ireland.
— BCCI (@BCCI) June 25, 2022
या मालिकेत भारताचा संघ भक्कम दिसत आहे. त्यांचेच या मालिकेत वर्चस्व असणार आहे, असे आयर्लंडचा कर्णधार अँड्रयू बालबर्नी (Andrew Balbirnie) यानेच पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
Pic courtesy – Cricket Ireland pic.twitter.com/gnVpDCyFB5
— BCCI (@BCCI) June 25, 2022
भारताचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेले अनेक खेळाडू या मालिकेत असणार आहे. याचा फायदा भारताला होऊ शकतो. त्या मालिकेतील दोन्ही सलामीवीर आयर्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी संघात असल्याने भारताला चांगल्या सुरूवातीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यानेही फिनीशरची भुमिका योग्य पार पाडली आहे. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याला अंतिम अकरामध्ये संघात जागा
भारत आणि आयर्लंड यांचा इतिहास पाहता, भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात तीन टी२० सामने खेळले असून हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. या मैदानावर २०१८मध्ये झालेल्या दोन टी२० सामन्यांमध्ये भारताने ७६ आणि १४३ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. हे दोन्ही सामने मालाहिदे येथेच खेळले गेले होते. त्याआधी भारतीय संघाने २००९च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडचा ८ विकेट्सने पराभव केला आहे.
आयर्लंडच्या हवामानाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही सामन्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भारताचा पुन्हा एकदा हिरमोड होणार आहे. याआधीच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका निर्णायक टी२० सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भात विरुद्ध आयर्लंड सामन्याचे थेय प्रक्षेपण सोनी नेटवर्कवर केले जाणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता सुरूवात होणार आहे.
भारतीय संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला झुकवत मध्य प्रदेशने पटकावली रणजी ट्रॉफी, जाणून घ्या आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद