---Advertisement---

ज्याच्या जीवावर खेळणार होते तोच बाहेर! आयर्लंडच्या प्रमुख गोलंदाजाची वर्ल्डकपमधून एक्झिट

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 9:26 PM
Ireland-Team
---Advertisement---

टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना विविध संघांना खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त केले आहे. भारत, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांच्यानंतर आता आयर्लंड संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज क्रेग यंग दुखापतीमुळे विश्वचषकात सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी आयर्लंड संघ व्यवस्थापनाने युवा ग्रॅहम ह्यूमला संघात स्थान दिले आहे.

https://twitter.com/ICC/status/1578741362857574400?t=H9fjyLPESU531UM8DC1bNQ&s=19

 

आयर्लंड संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार,

‘अनुभवी वेगवान गोलंदाज क्रेग यंग विश्वचषकात संघाचा भाग नसेल. एका जुन्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्यामुळे तो आयर्लंडला परतला आहे. या दुखापतीबाबत आम्हाला माहीत होते. परंतु, तो वेळ यादी ठीक होईल अशी अपेक्षा देखील होती. मात्र, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्याच्या जागी ग्रॅहम ह्यूम संघात येईल.’

यंग 2014 ला आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून सातत्याने दुखापतग्रस्त राहिला आहे. दुसरीकडे ह्यूम याने आतापर्यंत केवळ एक आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला आहे. तो सराव सामन्यांपासूनच आयर्लंड संघाचा भाग असेल. आयर्लंड टी20 विश्वचषक स्पर्धेत ब गटात समाविष्ट आहे. 17 ऑक्टोबर रोजी होबार्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ते आपल्या मोहिमेची सुरुवात करतील. त्यांना पात्रता फेरीत आपली क्षमता सिद्ध करून मुख्य फेरीसाठी जागा मिळवावी लागेल. तत्पूर्वी, 11 तारखेला नामिबियाविरुद्ध आणि 13 तारखेला मेलबर्नमध्ये श्रीलंकेविरुद्ध ते सराव सामने खेळतील.

टी20 विश्वचषकासाठी आयर्लंड संघ-

ऍण्ड्रू बालबर्नी (कर्णधार), पॉल स्टर्लिंग (उपकर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, कॉनोर ऑल्फर्ट, सिमी सिंग, हॅरी टेक्टर , लॉर्कन टकर, ग्रॅहम ह्यूम.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! विश्वचषकात ‘या’ दिग्गजाने भारतीय खेळाडूंना दिलेला सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला, वाचाच
पीएमडीटीए आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी स्पर्धेत अहान भट्टाचार्य, शर्विल गंगाखेडकर यांची आगेकूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---