KL Rahul Class Batting: जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो, तेव्हा संघात एक तरी खेळाडू असा असतो, जो संघाला त्या अडचणीतून बाहेर काढूनच दम घेतो. असाच एक खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल होय. राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे दिग्गज सुनील गावसकर आणि माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनी राहुलच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.
केएल राहुल (KL Rhaul) सेंच्युरियन (Centurion) येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात संघाच्या झटपट विकेट्स पडत होत्या, तेव्हा तो भारतीय संघासाठी संकटमोचक बनला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुल 70 धावा (KL Rahul 70 runs) करून नाबाद राहिला. याविषयी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ही खेळी शतकापेक्षा कमी नसल्याचे विधान केले.
गावसकरांचे विधान
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले, “आजचे हे अर्धशतक एक शतक होते किंवा 120 धावांच्या बरोबर आहे. उद्या त्याला एकही धाव बनवण्यास मिळते की नाही, हे यावर अवलंबून असेल की, तळातील फलंदाज त्याच्यासोबत कशाप्रकारे फलंदाजी करतात. मात्र, दो याचा पूर्ण हक्कदार आहे. जरी त्याला पुढे धावा करता आल्या नाहीत, पण माझ्यासाठी याच धावा शतकासारख्या आहेत.”
इरफान पठाणचे ट्वीट
दुसरीकडे, इरफान पठाण (Irfan Pathan) याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “शानदार लॉफ्टेड ड्राइव्ह, मैदानावर शानदार शॉट, जबरदस्त पुल, शानदार लिव्ह्ज, मजबूत डिफेन्स. केएल राहुलच्या या खेळीत हे सर्वकाही आहे. कठीण परिस्थितीत कौशल्याचे अभूतपूर्व प्रदर्शन.”
Sumptuous lofted drives, glorious shots along the ground, cracking pulls, excellent leaves, a rock-solid defence — this @klrahul innings has had it all. Phenomenal display for skills in demanding conditions. #INDvsSA
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 26, 2023
खरं तर, राहुलच्या या खेळीमुळे भारतीय संघ 200 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, राहुल कारकीर्दीत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मधल्या फळीत खेळत आहे. त्याने बराच काळ कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे, पण आता त्याच्याकडे नवीन जबाबदारी मिळाली आहे.
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण, भारताला सुरुवातीलाच तीन धक्के बसले. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला, पण चौथ्या विकेटनंतर नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. दुसरीकडे, राहुलन तळातील फलंदाजांच्या आधारे डाव पुढे नेत राहिला आणि त्याने संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा चमकला. त्याने 17 षटके गोलंदाजी करताना 44 धावा खर्चत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच, पदार्पणवीर नांद्रे बर्गरने 2 आणि मार्को यान्सेनने 1 विकेट नावावर केली. (irfan pathan and sunil gavaskar is happy after seeing kl rahul batting in 1st test said this know here)
हेही वाचा-
‘तो त्याचा शॉट आहे…’, पुल शॉट खेळून 5 धावांवर बाद झालेल्या रोहितला मिळाला बॅटिंग कोचचा भक्कम पाठिंबा
टीम इंडियाची बॅटिंग पाहून गावसकरांना झाली अजिंक्य रहाणेची आठवण; म्हणाले, ‘जर तो असता, तर आज…’