---Advertisement---

दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला…

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 8:21 AM
---Advertisement---

सध्या कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेला 10 जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर रोमांचक घडामोडी बघायला मिळत आहे. या स्पर्धेत बडोदा संघातील कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या संघातील उपकर्णधार दीपक हुड्डाने आपल्या संघाचा कर्णधार कृणाल पंड्या याच्यावर आपल्या सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. यावर आता बडोदा संघाचा माजी कर्णधार इरफान पठाणने प्रतिक्रिया दिली आहे.

इरफान पठाणने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहले आहे की, “बडोदा संघाचा माजी कर्णधार या नात्याने युवा खेळाडूंना सल्ला देताना, मी समजतो की, एक सामंजस्यपूर्ण वातावरण असणे किती महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी खेळाडू स्वतःला सुरक्षित समजू शकतात. मोकळेपणाने खेळू शकतील आणि संघासाठी आपले सर्वश्रेष्ठ देऊ शकतील. ”

“जर मी दीपक हुड्डाचे प्रकरण ऐकले आहे, तर ते सत्य आहे. हे आश्चर्यचकित करणारे आणि निराशाजनक आहे. कोणत्याही खेळाडू सोबत असा व्यवहार केला जावू नये.” पठाणने स्वप्निल सिंह आणि आदित्य वाघमोडे सारख्या प्रतिभावान खेळाडूंच्या अनुचित निवडीचे सुद्धा संकेत दिले.

https://www.instagram.com/p/CJ8DqJwh40Y/?igshid=1c5227pnee3tk

पठाणने लिहले, “नुकत्याच काही दिवसात अशा गोष्टी घडल्या आहेत. ज्यांच्यात योग्य युवा प्रतिभा आहे. ज्यांनी 30 पेक्षा कमी वयात चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे निवड करताना दुर्लक्ष करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त आदित्य वाघमोडे , ज्याने मागील सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक जास्त धावा केल्या आहेत. त्याने 364 धावा केल्या आहे. त्याचबरोबर स्वप्निल सिंहने 216 धावांची खेळी करून अष्टपैलू कामगिरी केली आणि 10 विकेट्स घेतल्या आहेत. यांच्याकडे ही दुर्लक्ष केले आहे. ”

पठाणने पुढे लिहले, “बीसीएच्या सर्व सदस्याने यावर लक्ष देणे आणि निंदा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर या गोष्टींना विरोध करायला हवा. कारण हे क्रिकेट या खेळासाठी योग्य नाही.” तत्पूर्वी रविवारी दीपक हुड्डाने ज्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. त्यावर बीसीएने त्यावर संघाच्या मॅनेजरकडून अहवाल मागवला आहे. दीपक हुड्डाने केलेल्या तक्रारीत म्हणले आहे की, कृणाल पंड्याने त्याच्यासोबत गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

आएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्टविरुद्ध भेकेच्या गोलमुळे बेंगळुरूला बरोबरीचा दिलासा

असे ३ प्रसंग जेव्हा स्टीव स्मिथ अडकला होता वादात

कसोटी इतिहासातील अविस्मरणीय राहिलेले भारताचे ५ अनिर्णित सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---