Irfan And Yousuf Pathan : वन वर्ल्ड विरूद्ध वन फॅमिली दरम्यानच्या चॅरिटी मॅचमध्ये ‘बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुबहानल्लाह’ या फेमस बॉलिवूड डायलॉगची प्रचिती अनेक क्रिकेटप्रेमींना आली. इरफान पठानने आपलाच मोठा भाऊ युसूफच्या गोलंदाजीवर जोरदार सिक्स लावत सामना संपवला. पण, मॅच संपल्या संपल्या त्याने धावत जाऊन आपल्या भावाला मिठी मारली.
चॅरिटी मॅच वन वर्ल्ड आणि वन फॅमिली या दोन संघांमध्ये खेळला गेला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर(Sachin Tendulkar) वन वर्ल्डचा तर युवराज सिंग(Yuvraj Singh) वन फॅमिली संघाचा कर्णधार होता. तसेच या सामन्यात बऱ्याच दिग्गज खेळाडूंनीही सहभाग घेतला होता. शेवटच्या 2 चेंडूत 3 धावा शिल्लक असताना, फलंदाजीस इरफान पठान स्ट्राइकवर होता, तर गोलंदाज होता त्याचाच भाऊ युसूफ. हा मजेशीर किस्सा कॅमेरात कैद झाला असून, याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.
Irfan Pathan finishes off in style with a Sixer
One World wins against One Family #IrfanPathan#YusufPathan#SachinTendulkar #YuvrajSingh#ParthivPatel#HarbhajanSingh
Good to hear Aakash Chopra as well in commentary box on Hotstar after ages. pic.twitter.com/xFIcsCsDsJ— Pritesh (@Priteshjoshi100) January 18, 2024
व्हिडीयोत आपण पाहू शकतो कि, इरफानने आपल्या मोठ्या भावाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत एक जबरदस्त षटकार मारत सामना संपवला आहे. मात्र लगेच जाऊन तो युसूफच्या गळ्यात पडल्याचेही दिसले. युसूफनेही मोठेपणा दाखवत आपल्या भावास शाब्बासकी दिली. यानंतर सर्व खेळाडू आपापल्या ड्रेसिंगरूम कडे गेले. सामन्यात इरफान पठानने वन वर्ल्डकडून खेळताना 5 चेंडूत 12 धावा केल्या तर सचिनने 16 चेंडूत 27 धावा केल्या.
सामना साई क्रिश्न्नन क्रिकेट स्टेडियम, कर्नाटकला खेळवला गेला.
हेही वाचा –
T20 वर्ल्डकपसाठी 15 शिलेदार फिक्स? शतकी खेळी केल्यानंतर स्वतः रोहितकडून मिळाले संकेत