---Advertisement---

भारताचा एकेवेळचा शेर गोलंदाज करतोय कमबॅकचा विचार

On: रविवार, मे 10, 2020 2:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार झाला आहे. परंतु यासाठी त्याने काही अटी ठेवल्या आहेत.

जानेवारी २०२०मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा इरफान म्हणतो, जर भारतीय निवड समितीने त्याला आश्वासन दिले तर तो नक्की कमबॅक करेल. यासाठी त्यांना निवड समितीने एक वर्षांचा वेळ द्यावा. या काळात तो अतिशय मन लावुन क्रिकेटची तयारी करेल.

संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर बीसीसीआयचे अधिकारी माझ्याशी संपर्क करुन मला वेळ देणार असेल आणि मला टीम इंडियातील निवडीसाठी योग्य मानत असतील तर मी नक्कीच प्रयत्न करेल. परंतु यासाठी कोण पुढाकार घेणारा हा मोठा प्रश्न आहे, असे यावेळी इरफान म्हणाला.

इरफानचे वय सध्या ३५ वर्ष आहे. तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९ वर्षांचा असताना खेळला होता.

इरफान भारताकडून २९ कसोटी, १२० वनडे व २४ टी२० सामने खेळला आहे. २००३ मध्ये पदार्पण केलेल्या इरफानने २०१२मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---