माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठानचा बुधवार (२७ ऑक्टोबर) ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. २७ ऑक्टोबर १९८४ रोजी गुजरातच्या बडोदा शहरात जन्मलेला हा डावखुरा क्रिकेटपटू कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज आहे. तब्बल १४ वर्षांपुर्वी म्हणजेच २००६ साली पाकिस्तान संघाविरुद्ध त्याने हा किर्तीमान नोंदवला होता.
जानेवारी २००६ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना कराची येथे झाला होता. या कसोटी सामन्यात त्यावेळीचा कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने पहिलेच षटक टाकण्यासाठी इरफानकडे चेंडू सोपवला होता.
इरफानने पहिल्याच षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर विकेट्स घेत हॅट्रिक साजरी केली होती. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान बटला बाद केले. सलमानने या चेंडूवर फटका मारायचा प्रयत्न केला असताना चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन द्रविडच्या हातात झेल गेला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या युनुस खानला पाचव्या चेंडूवर इरफानने पायचीत केले. तर सहाव्या चेंडूवर मोहम्मद युसुफला इरफानने त्रिफळाचीत करत ही हॅट्रिक घेतली होती. इरफानने पाकिस्तानची वरची फळी बाद केल्यानंतर मात्र पाकिस्तानने या सामन्यात चांगले पुनरागमन करत पुढे जाऊन हा सामना ३४१ धावांनी जिंकला होता.
Enjoy again. Irfan vs. Wasim !#HappyBirthday @IrfanPathan @wasimakramlive @ImranKhanPTI https://t.co/3T87MW7LOU
— subu sastry (@suubsy) October 27, 2020
असे असले तरी, सलग ३ फलंदाजांना तंबूत पाठवत इरफान कसोटी सामन्यातील पहिल्याच षटकात हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याच्यानंतर आतापर्यंत कोणताही गोलंदाज हा विक्रम करु शकला नाही. एवढेच नव्हे तर, तो कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा हरभजन सिंगनंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता.
टी२० विश्वचषक २००८च्या अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन
आपणा सर्वांना माहिती आहे की, भारतीय क्रिकेटसाठी २००७ हे वर्ष खूप राहिले होते. कारण या वर्षी भारतीय संघाने टी२० विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. दरम्यान इरफाननेही भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. विशेषत त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४ षटकात केवळ १६ धावा देत ३ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले होते. त्याच्या या कमालीच्या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Playing against Pakistan seemed to bring out the best in Irfan Pathan. In ICC tournaments, he took nine wickets against them in four matches, at an average of 11.11 ????
????️ WATCH: On the India paceman's birthday, revisit his ???? 3/34 from the 2004 ICC Champions Trophy. pic.twitter.com/yyhpVXb2e8
— ICC (@ICC) October 27, 2020
इरफान पठानची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
इरफानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००३-०४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केली होती. त्यावेळी त्याने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर २००६ साली दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यातून त्याने टी२० क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. जानेवारी २०२०ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या इरफानने २९ कसोटी सामने खेळले असून ११०५ धावा आणि १०० विकेट्स घेतल्या आहेत.
तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १२० सामन्यात १५४४ धावा आणि १७३ विकेट्सची कामगिरी केली आहे. तसेच टी२० क्रिकेटमध्ये त्याने २४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १७२ धावा आणि २८ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे.
ट्रेंडिंग लख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी






