Rachin Ravindra IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव जवळ आला आहे. 11 दिवसांनी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये हजारो खेळाडूंवर बोली लागणार आहे. आयपीएल 2024 लिलाव प्रक्रियेत खेळाडूंवर सर्व फ्रँचायझींच्या नजरा असणार आहेत. त्यातील एक खेळाडू म्हणजे न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू रचिन रवींद्र होय. विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वांनी रचिनची शानदार फलंदाजी पाहिली आहे. तेव्हापासून आयपीएल फ्रँचायझींच्या नजरा त्याच्यावर आहेत. रचिन शानदार फलंदाजीसोबतच भन्नाट गोलंदाजीही करतो. तेच आता भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने रचिनविषयी मोठे विधान केले आहे.
इरफान पठाणचे विधानRachin-Ravindra
इरफान पठाण (Irfan Pathan) याने मोठे भाष्य करत रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघात सामील करण्याचा सल्ला दिला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान म्हणाला, “हैदराबाद फ्रँचायझीला एक चांगल्या फिरकीपटूची गरज आहे, जो विकेट घेऊ शकेल. त्यांच्याकडे मयंक मार्कंडे आहे, पण सनरायझर्स हैदराबादला त्याच्यापेक्षा जास्त गरज अशा खेळाडूची आहे, जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये मदत करू शकेल.”
पुढे बोलताना इरफान असेही म्हणाला की, “त्यामुळे विश्वचषक 2023 स्टार रचिन रवींद्र त्यांना सुरुवातीच्या फलंदाजी क्रमात मोलाची भूमिका साकारण्यात मदत करू शकतो. संघाला एक योग्य फिरकीपटू हवाये, जो विकेट घेणारा असेल. त्यांच्याकडे आदिल रशीद होता, पण संघाने त्याला रिलीज केले आहे. अष्टपैलूची बाब आहे, तर दोन अष्टपैलू वास्तवात चांगले प्रदर्शन करत आहेत. ते म्हणजे वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को यान्सेन होय. आता जर हैदराबादने रचिनला सामील केले, तर त्यांची प्लेइंग इलेव्हन खूप मजबूत होईल.”
रचिनने गाजवला वनडे विश्वचषक
खरं तर, रचिन रवींद्र वनडे विश्वचषक 2023 (Rachin Ravindra World Cup 2023) स्पर्धेत चांगलाच चमकला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने 10 सामन्यात 106.44च्या स्ट्राईक रेटने 578 धावा केल्या. यामध्ये 3 शतकांचाही समावेश होता. यादरम्यान रवींद्रने 9 डावात 5 विकेट्सही नावावर केल्या होत्या.
सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू
आगामी हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादने अनेक खेळाडूंना रिटेन केले. यामध्ये एडेन मार्करम, भुवनेश्वर कुमार, ग्लेन फिलिप्स, हेन्रीच क्लासेन, मार्को यान्सेन आणि इतर खेळाडू आहेत. तसेच, संघाने आदिल रशीद, अकील होसेन, हॅरी ब्रूक यांसारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे. (irfan pathan on New Zealand Cricketer rachin ravindra said this ipl 2024 sunrisers hyderabad)
हेही वाचा-
याला म्हणतात मॅच! अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेचा 1 विकेटने रोमांचक विजय, आयर्लंडला चारली धूळ; सिंकदर ठरला हिरो
धक्कादायक! CWC 23मधील फायनलसह ICCने ‘या’ 5 सामन्यांतील खेळपट्ट्यांना दिली सरासरी रेटिंग, कोणत्या ते घ्या जाणून