दोन वेळा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) विजेते कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)ने चंद्रकांत पंडित यांची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. चंद्रकात पंडित यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी इरफान पठाणच्या जुन्या ट्विटला उत्तर दिले. वेंकी म्हैसूरच्या उत्तरानंतर इरफाननेही त्याला मजेशीर उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाखाली नुकत्याच झालेल्या रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेशने पहिले विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेशला विजेता बनवल्यानंतर इरफान पठाणने ट्विटरवर त्याचे कौतुक केले आणि त्याच्यासाठी आयपीएल करार असावा असे लिहिले होते. इरफानच्या या जुन्या ट्विटवर पंडित यांना प्रशिक्षक बनवल्यानंतर केकेआरच्या सीईओने उत्तर दिले की, “इरफान भाई आम्ही तुमचे ऐकत आहोत.”वेंकी म्हैसूरच्या या ट्विटनंतर इरफानने आणखी एक ट्विट केले. इरफानने लिहिले की, “हाहा वेंकी भाई, तुम्हाला आणि चंदू भाईला शुभेच्छा… मी तुम्हाला माझे बँक तपशील पाठवत आहे.”
Haha Venky bhai🤝🙌. Wishing you and Chandu bhai all the luck. I’m sending you my bank details 😉
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 17, 2022
मॅक्युलमच्या जागी पंडित
चंद्रकांत पंडित हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. त्याच्या नावावर एकूण ६ रणजी विजेतेपदे आहेत. पंडित हा न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमची जागा घेणार आहे. मॅक्युलमची नुकतीच इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२०२२ आयपीएल मध्ये केकेआर अपयशी
दोन वेळचा चॅम्पियन केकेआरला यंदाच्या आयपीएलमध्ये आपली चुणूक दाखवता आली नाही. केकेआरला त्यांच्या १४ सामन्यांत केवळ ६ सामने जिंकता आले. गुणतालिकेत ते सातव्या क्रमांकावर होते.
प्रशिक्षक झाल्यानंतर पंडित म्हणाले- माझ्यासाठी मोठा सन्मान आहे
प्रशिक्षक बनल्यावर चंद्रकांत पंडित म्हणाले की, ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. मी केकेआरच्या कौटुंबिक संस्कृतीबद्दल आणि यशाच्या परंपरेबद्दल केकेआर आणि इतर काही खेळाडूंकडून ऐकले आहे. ते पुढे म्हणाले की, या संधीची मी नम्रतेने आणि सकारात्मक अपेक्षांसह वाट पाहत आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दिग्गज खास हरभजन सिंगसाठी गिफ्ट घेऊन यायचा! स्वत: ‘भज्जी’ने केला खुलासा
जेमिमाला चुकवावी लागली दुखापतीसह खेळण्याची किंमत; महत्त्वाची स्पर्धा सोडली निम्म्यात
झिम्बाब्वेच्या गोपिकांना भारताच्या कन्हैयाची भुरळ! चाहरचा महिला चाहतींसोबतचा व्हिडिओ व्हायरल