सध्या भारत देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे भारताचे काही क्रिकेटपटूही या आजाराच्या विळख्यात सापडले. तर, काहींना आपल्या कुटुंबियांनादेखील या जीवघेण्या आजारात गमावावे लागले. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण हादेखील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजनंतर कोरणा पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर यातून सावरल्यानंतर आयपीएलमध्ये समालोचन केले होते. इरफानने नुकताच एक ऑनलाईन व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये तो धावताना दिसतोय.
दोन किलोमीटर धावला इरफान
इरफान पठाणने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो धावताना दिसतोय. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिले,
‘कोरोनामधून सावरल्यानंतर मी प्रथमच धावलो. मला २ किलोमीटर धावायचे होते. यातून माझी तंदुरुस्ती किती आहे हे मला पाहायचे होते. २ मीटर धावण्यासाठी मी ११ मिनिटे वेळ घेतला. पुढे यात काय प्रगती झाली तर मी तुम्हाला सांगेल.’
यासोबतच इरफानने आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे ज्यामध्ये तो म्हणाला, “कोरोना झाला तरीही घाबरून जाण्याचे काम नाही. तुम्ही मेहनत घेत राहायची. बरे झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. कोरोनाचे काही टप्पे आहेत. अनेकदा रुग्ण घरी राहून देखील बरे झालेले दिसतायेत. काही लोक यातून पूर्णता बरे झाले तर काहींना दुर्देवाने जीव गमवावा लागला.”
https://www.instagram.com/p/CPLVS0BhGVR/
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजनंतर सापडला कोरोना पॉझिटिव्ह
रायपूर येथे झालेली रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपल्या नावे केली होती. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसूफ पठाण बंधू व एस बद्रीनाथ हे चौघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच, आयपीएल २०२१ मध्ये खेळाडू व काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने स्पर्धा स्थगित करावी लागली. वरूण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, अमित मिश्रा, वृद्धिमान साहा व टीम सायफर्ट या खेळाडूंसह माईक हसी व एल बालाजी हे चेन्नईचे प्रशिक्षक कोरोना बाधित असल्याचे पुढे आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशने सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा ३३ धावांनी पहिल्या वनडेत उडवला धुव्वा
आयपीएलमध्ये खेळणार का? पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने दिले ‘हे’ उत्तर






