सध्या देशात आयपीएल 2024 ची धूम आहे. जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये दररोज एकापेक्षा एक धमाकेदार सामने पाहायला मिळतायेत. आयपीएल संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. त्यामुळे सध्या त्याची देखील चर्चा होते आहे.
वास्तविक, बीसीसीआय येत्या काही दिवसांत जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं 2024 टी20 विश्वचषकासाठी त्याची 15 सदस्यांची भारतीय टीम निवडली. इरफानच्या या टीममध्ये काही मोठे नावं मिसिंग आहेत.
तसं पाहिलं तर, इरफान पठाणनं निवडलेली टीम कागदावर खूप मजबूत आहे. त्यानं स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला केवळ एका अटीवर टीममध्ये स्थान दिलंय. इरफाननं म्हटलंय की, जर हार्दिक सातत्यानं गोलंदाजी करणार असेल तर त्याला विश्वचषकाच्या टीममध्ये संधी मिळायला हवी. याचाच अर्थ हार्दिकला केवळ फलंदाज म्हणून इरफानच्या टीममध्ये स्थान नाही.
इरफान पठाणनं त्याच्या टीममध्ये विराट कोहलीला स्थान दिलंय. शिवाय चालू आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या शिवम दुबेचाही संघात समावेश आहे. इरफाननं गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी संधी दिली आहे. तर त्यानं शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांच्या पैकी कोण्या एकाची निवड करण्याचा पर्याय ठेवला आहे.
इरफानच्या संघात विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला स्थान देण्यात आलंय. मात्र लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा संघात समावेश नाही. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर असेल. तर रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय त्यानं ठेवला आहे.
2024 टी20 विश्वचषकासाठी इरफान पठानचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (गोलंदाजी करत असल्यास), रिंकू सिंह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, शुबमन गिल/संजू सॅमसन, रवी बिश्नोई/युजवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या –
रवींद्र जडेजाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती देणं चेन्नईलाच पडतंय महागात? कसं ते समजून घ्या
चेपॉकमध्ये लखनऊच्या एका चाहत्यानं केली चेन्नईच्या लाखो चाहत्यांची बोलती बंद; व्हिडिओ खूपच व्हायरल
मार्कस स्टॉयनिसनं केलं चेन्नईला शांत! सीएसकेचा घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव