भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपला आयपीएल ड्रीम इलेव्हन संघ निवडला आहे. इरफानच्या या संघात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्थान दिले नाही. विशेष म्हणजे या हंगामात विराटने आपल्या संघाला प्ले-ऑफपर्यंत नेण्यात यश मिळवले होते, तर रोहितने आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएलचे विजितेपद जिंकून दिले. असे असूनही इरफानने त्यांना आपल्या संघातून डच्चू दिला आहे.
खरं तर आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा प्रवास १० नोव्हेंबरलाच संपला आहे. दुबईत खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने पराभूत करत आयपीएलचे पाचवे विजेतेपद उंचावले. आता आयपीएलचा १३ वा हंगाम संपल्यानंतर अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेटतज्ज्ञ आपापला आयपीएल २०२०चा संघ बनवत आहेत. यामध्ये इरफानचाही समावेश आहे.
केएल राहुल आणि शिखर धवनला केले सलामीवीर
इरफानने आपल्या आयपीएल २०२०च्या ड्रीम इलेव्हन संघाचे सलामीवीरपद केएल राहुल आणि शिखर धवन या धडाकेबाज फलंदाजांकडे सोपवले आहे. त्याने म्हटले की, “मी डेविड वॉर्नरला सलामीवीर करणार नाही. कारण केवळ चार परदेशी खेळाडूंची निवड करायची आहे.”
मधल्या फळीत डिविलियर्स
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर त्याने मुंबईचा दमदार खेळाडू सूर्यकुमार यादवला निवडले आहे, तर मधल्या फळीत त्याने चौथ्या क्रमांकावर एबी डिविलियर्सला निवडले आहे.
पाचव्या क्रमांकावर पोलार्डला निवडत बनवले कर्णधार
इरफानने या संघाचा कर्णधार म्हणून कायरन पोलार्डची निवड केली. तो म्हणाला, “कायरन पोलार्डने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे मला वाटते. तो माझ्या संघाचा कर्णधारही असेल. माझ्याकडे हार्दिक पंड्याच्या रूपात पर्याय होता, परंतु तो गोलंदाजी करत नाही. पोलार्ड गोलंदाजीसोबतच कर्णधारपदाची भूमिकाही साकारेल. तो अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. मी त्याला थ्री डायमेंशनल खेळाडू म्हणून निवडले.”
असे आहेत गोलंदाज
यानंतर त्याने वेगवान गोलंदाज मार्कस स्टॉयनिस, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीची निवड केली. सोबतच फिरकीपटू गोलंदाज म्हणून त्याने युझवेंद्र चहल आणि मार्कस स्टॉयनिसला निवडले.
असा आहे इरफान पठाणचा आयपीएल २०२० ड्रीम इलेव्हन संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस, राहुल तेवतिया, युझवेंद्र चहल, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या-
नेमकं चाललंय तरी काय! अजित आगरकरच्या IPL २०२० प्लेइंग इलेव्हन मधूनही ‘रोहित-विराट’ गायब
अन्य दिग्गजांप्रमाणे हर्षा भोगले यांनीही निवडला त्यांचा आयपीएल २०२० संघ; रोहित-विराटला स्थान नाही
आयपीएल २०२०मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ५ धडाकेबाज फलंदाज, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केली निवड
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…