---Advertisement---

आयपीएल २०२०मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ५ धडाकेबाज फलंदाज, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केली निवड

On: सोमवार, नोव्हेंबर 16, 2020 7:44 AM
---Advertisement---

आयपीएलचा १३ वा हंगामात अनेक फलंदाजांनी अविस्मरणीय प्रदर्शन केले. याचदरम्यान काही असेही दिग्गज फलंदाज पाहायला मिळाले ज्यांना या हंगामात आपली धडाकेबाज कामगिरी करता आली नाही. या हंगामाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद उंचावले. या हंगामात सूर्यकुमार यादव, देवदत्त पडिक्कल, इशान किशन यांसारख्या युवा खेळाडूंनी आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. अशामध्ये आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने या हंगामातील धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या ५ फलंदाजांची नावे सांगितली आहेत.

केएल राहुलला अव्वलस्थान
क्रिकबझवर बोलताना मायकल वॉने ५ फलंदाजांची निवड केली. त्याने आपल्या या यादीत अव्वलस्थानी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलला ठेवले आहे. राहुलने या हंगामात अफलातून कामगिरी केली आहे. त्याने १४ सामने खेळताना १२९.३४ च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ६७० धावा ठोकल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने या हंगामातील ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली आहे. तरीही, त्याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर पंजाब संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही.

दुसऱ्या स्थानी क्विंटन डी कॉक, तर तिसऱ्या स्थानी अष्टपैलू कायरन पोलार्ड
मायकल वॉने या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला ठेवले आहे. त्याने या हंगामात १६ सामने खेळताना १४०.५० च्या स्ट्राईक रेटने ५०३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ अर्धशतकेही ठोकली आहेत.

डीकॉकनंतर तिसऱ्या क्रमांकावर त्याचाच संघसहकारी अष्टपैलू कायरन पोलार्डला ठेवले आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून खेळताना या हंगामात १६ सामन्यात १९१.४२ च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा केल्या आहेत. पोलार्डने मुंबई संघाकडून महत्त्वाच्या वेळी शानदार खेळीही केल्या आहेत.

चौथ्या स्थानी हार्दिक पंड्या
या यादीत चौथ्या स्थानी हार्दिक पंड्याला ठेवण्यात आले आहे. या हंगामात पंड्याने शानदार फटकेबाजी केली. त्याने १४ सामने खेळताना १७८.९८ च्या स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत ३७ धावाही कुटल्या, त्यामुळे मुंबई संघाची धावसंख्या २००पर्यंत पोहोचण्यात मदत झाली.

मुंबईचाच दमदार फलंदाज सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानी
वॉने सूर्यकुमार यादवने जोरदार प्रशंसा केली. सोबतच त्याला या हंगामातील सर्वोत्तम फलंदाजही सांगितले. वॉने यापूर्वीही ट्विटरवर सूर्यकुमारबद्दल वक्तव्य केले होते. सूर्यकुमारने या हंगामात १६ सामने खेळताना १४५.०१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४८० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आर्चर, बुमराह आणि कमिन्सपेक्षा ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, आयपीएल गाजवणाऱ्या पडिक्कलचे वक्तव्य

बापरे! युएईत आयपीएल भरवणे बीसीसीआयला पडले महागात; चुकवावी लागली मोठी किंमत

काय सांगता! पुण्याचा संघ आयपीएलमध्ये येणार परत?

ट्रेंडिंग लेख-

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---