२००० नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील दोन महासत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ऑस्ट्रेलियाचा २००१ भारत दौरा असो नाहीतर २००३ विश्वचषक अंतिम सामना. त्यानंतरच्या देखील तमाम मालिका तसेच २००७ टी२० विश्वचषकातील उपांत्य सामना व २०११ विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामना, यामध्ये दोन्ही संघातील द्वंद पाहायला मिळाले. दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध इर्षेने खेळत होते.
मैदानावरील या लढतीचा परिणाम लढतीच्या बाहेरदेखील होत. भारतीय प्रेक्षकांचा काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कमालीचा राग होता. यामध्ये रिकी पॉंटिंग, अँड्रू सायमंड्स, डॅरेन लेहमन यांचा समावेश होता. परं,तु काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय प्रेक्षक भारतीय खेळाडूं ईतकेच प्रेम करतात.
आज अशाच, तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊया ज्यांना भारतीय प्रेक्षकांनी खूप प्रेम आणि प्रोत्साहन देताना पाहिले आहे.
१) ब्रेट ली
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीवर सर्वच भारतीय क्रिकेट रसिक खूप प्रेम करतात. ब्रेट ली स्वतः असे म्हटला होता,
“माझी गोलंदाजीची शैली सर्वात जास्त कोठे वापरली जात असेल तर ते ठिकाण भारत आहे.” ब्रेट ली याला भारतीय संगीताची खूप आवड आहे. त्याने भारताच्या महागायिका आशा भोसले त्यांच्यासमवेत गाणे देखील गायलेले आहे.
आयपीएलमध्ये खेळताना ब्रेट ली आणि भारतीय चाहत्यांचे संबंध अधिक वृद्धिंगत झाले. २०१५ मध्ये त्याने ‘अनइंडियन’ या चित्रपटात देखील काम केले. आजही ज्या वेळी भारतात येतो त्यावेळी, रस्त्यावरील अनेक चमचमीत पदार्थ खाताना तसेच भारतीय पेहराव केलेला आपण पाहतो.
२) अॅडम गिलख्रिस्ट
अॅडम गिलख्रिस्ट हा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. गिलख्रिस्टची कामगिरी देखील, ऑस्ट्रेलियाच्या २०००- २०१० दरम्यानच्या यशाचे मुख्य कारण आहे. त्याच्याकडे स्वतःची खेळाची वेगळी शैली आहे आणि म्हणूनच भारतीय चाहत्यांनाही त्याची आक्रमक शैली आवडते. चांगल्या खेळासोबतच तो एक इमानदार खेळाडू म्हणून ही क्रीडा जगतात प्रसिद्ध आहे.
२००९ मध्ये, त्याने डेक्कन चार्जर्सला त्याच्या नेतृत्वात आयपीएल विजेते बनवले पण तोपर्यंत तो भारतात बराच लोकप्रिय झाला होता. भारतातील युवा खेळाडूंना त्याच्याप्रमाणे फलंदाजी करायला आवडते आणि त्याच्या खेळाच्या शैलीचे देखील अनुकरण अनेक खेळाडू करताना दिसतात.
गिलख्रिस्टला हिंदी भाषेची आवड आहे. अनेकदा तो आपल्या पद्धतीने हिंदी बोलायचा प्रयत्न करतो.
३) डेव्हिड वॉर्नर
भारतीय संघाविरुद्ध नेहमी चांगला खेळणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील भारतीय प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. भारतीय चाहते देशातील प्रत्येक मैदानावर त्याचे उत्साहात स्वागत करतात.
ऑस्ट्रेलियाच्या या आक्रमक फलंदाजाने भारतात स्वतःचे वेगळे नाव बनविले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद देण्यापासून ते भारतीय गाण्यांवर जबरदस्त व्हिडिओ बनवण्यापर्यंत, वॉर्नरने भारतीय चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.
सध्या लॉकडाऊनच्या वेळीही डेव्हिड वॉर्नरने भारतीय चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. वॉर्नर दक्षिण भारतीय, बॉलिवूड आणि अगदी पंजाबी गाण्यांवर देखील टिक टॉक व्हिडिओ बनवून त्याद्वारे भारतीय प्रेक्षकांशी नाळ जोडून होता.
हेही वाचा-