आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. कोविड-१९ महामारीमुळे भारताबाहेर, युएई येथे या हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत बंद दारामागे खेळवण्यात आलेली ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि एमिरेट्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनी यशस्वी करून दाखवली. आयपीएलच्या समाप्तीनंतर आता स्पर्धेदरम्यान झालेल्या आर्थिक बाबींची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. बीसीसीआयने स्पर्धेच्या आयोजनासाठी ईसीबीला तब्बल १०० कोटी रुपये दिल्याचे वृत्त आहे.
तीन मैदानांचे भाडे म्हणून भरले १०० कोटी
बेंगलोर मिररच्या म्हणण्यानुसार, “बीसीसीआयने आयपीएल २०२० साठी ईसीबीला १०० कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली आहे. दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयने तब्बल १४ कोटी डॉलर्स खर्च केले. भारतातील राज्य क्रिकेट संघटनांना या स्पर्धेच्या आयोजनातून ६० सामन्यांसाठी ६० कोटी रुपये मिळाले असते. या १०० कोटींव्यतिरिक्त इतर मार्गाने देखील युएईमध्ये बरीच आर्थिक उलाढाल झाली आहे. युएईतील १४ पंचतारांकित हॉटेल तीन महिने आरक्षित केली गेली होती.”
बीसीसीआयचे झाले नुकसान
आयपीएल २०२० युएईमध्ये आयोजित केली गेल्याने बीसीसीआयला ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. बीसीसीआयने ६० सामन्यांच्या आयोजनासाठी दिलेली १०० कोटी रुपयांची रक्कम भारतात सामने आयोजित केले असते, तर ६० कोटींपर्यंत मर्यादित राहिली असती. नव्या नियमानुसार, एक सामना आयोजित करण्यासाठी बीसीसीआय, राज्य क्रिकेट संघटनांना एक कोटी रुपये देते.
मागील आठवड्यात संपलेल्या, आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत आपले पाचवे विजेतेपद पटकावले होते. आगामी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे संभाव्य आयोजनस्थळ म्हणून युएईचा विचार केला जात आहे. आयपीएल २०२१ भारतात आयोजित करणे शक्य झाले नाही, तर आयपीएलचा तो हंगाम देखील युएईत भरवला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर





