आयपीएल २०२० चा हंगाम अत्यंत रोमांचक राहिला. या हंगामात युवा फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. त्यातीलच एक नाव म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल. पडिक्कलने या हंगामात जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स यांसारख्या अनेक घातक गोलंदाजांचा सामना केला. परंतु त्याला सर्वात आव्हानात्मक वाटणाऱ्या गोलंदाजाचं त्याने नाव सांगितले आहे.
आयपीएल एक वेगळ्या प्रकारचे आव्हान
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत पडिक्कलने महत्त्वाच्या गोष्टींवर आपले मत व्यक्त केले. यादरम्यान त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, आयपीएलमध्ये तू आर्चर, बुमराह आणि कमिन्स यांसारख्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला. ज्यांचा जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठे नाव आहे. त्यामुळे तुझ्या फलंदाजीत सुधारणा झालीय का?
यावर प्रत्युत्तर देत पडिक्कल म्हणाला, “होय. देशांतर्गत क्रिकेटच्या तुलनेत आयपीएल एक वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे. परंतु मला माहिती होते की, मी या आव्हानासाठी तयार आहे. कारण आम्ही आयपीएल सुरू होण्यापूर्वी ३ आठवड्यापूर्वीच जोरदार सराव केला होता.”
यानंतर त्याला पुढे प्रश्न विचारण्यात आला की, यापूर्वी कधीच अशा वेगाचा सामना केला नाही, असे कोणत्या गोलंदाजाविरुद्ध वाटते?
या गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक
याचे उत्तर देताना तो म्हणाला, “वेग नाही. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे अनेक गोलंदाज आहेत, जे खूप वेगाने गोलंदाजी करतात. जर अशा गोलंदाजाबद्दल बोलायचं झालं, ज्याचा सामना करणे आव्हानात्मक होते, तर तो राशिद खान होता. कारण त्याच्याकडे खरंच योग्य वेग आहे. सोबतच त्याच वेगावर चांगला टर्नही आहे. तुम्ही त्याला सहजरीत्या ओळखू शकत नाही. जेव्हा मी त्याचा सामना करत होतो, तेव्हा मला असे वाटले की यापूर्वी मी अशाप्रकारच्या चेंडूवर खेळलो नाही.”
या हंगामात केले बेंगलोरकडून पदार्पण
या २० वर्षीय युवा फलंदाजाने या हंगामात बेंगलोर संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये तो सर्वात यशस्वी खेळाडूही ठरला आहे. त्याने आपल्या बेंगलोर संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात त्याने ५ अर्धशतके ठोकली आहेत. यासोबतच त्याने ४७३ धावाही आपल्या नावावर केल्या आहेत. याबाबतीत त्याने कर्णधार विराट कोहली (४६६) आणि एबी डिविलियर्स (४५४) यांनाही मागे टाकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! युएईत आयपीएल भरवणे बीसीसीआयला पडले महागात; चुकवावी लागली मोठी किंमत
‘विश्वास नसेल तर प्रेमही नाही’ जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या क्रिकेटपटूचे ट्वीट
काय सांगता! पुण्याचा संघ आयपीएलमध्ये येणार परत?
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर






