भारतीय क्रिकेट संघातील पठाण बंधू म्हणजेच इरफान पठाण आणि यूसुफ पठाण होय. हे दोन्ही क्रिकेटपटू त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील निवृत्तीनंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते दोघेही काही महिन्यांपुर्वी ‘द कपिल शर्मा’ शोलाही गेेले होते.
यादरम्यान इरफानने एका मजेशीर गोष्टीचा खुलासा केला. तो सचिन तेंडुलकरसमोर कधीही जेवण करत नव्हता, असे त्याने सांगितले आहे. Irfan Pathan Speaks about his eating secret in front of sachin tendulkar in kapil sharma show.
शोमध्ये गेल्यानंतर कपिल शर्मा यांनी इरफानला प्रश्न विचारला की, असे ऐकण्यात आले आहे की, तु संघात असताना सचिनसमोर जेवन करत नसायचा. यावर डोके हालवत इरफानने होकार दिला. म्हणून कपिल शर्माने इरफानची मजा घेत त्याला म्हटले की, असे का? सचिन तुझ्या जेवनाला नजर लावत होता का जेवताना तुला खायला मागत होता? त्यानंतर इरफानने पुर्ण कहानी संगितली की तो का सचिनसमोर जेवन करत नव्हता.
इरफान म्हणाला, “२००४मध्ये पाकिस्तानविरुद्ध लाहोरमध्ये सामना होता. तो माझा दुसराच दौरा होता. सामान्यत: जेव्हा तुम्ही लहान असता, तेव्हा बाहेर गेल्यानंतर नक्की कसे वागायचे? हे तुम्हाला माहित नसते. तुम्ही घरी जे वागता, तसेच बाहेरही वागता. मी तिथे ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो.”
“मला लहानपणीपासूनच जास्त भात खायची सवय होती. मी माझ्या थाळीमध्ये खूप भात वाढून घेतला होता. तिकडे मैदानावर नाणेफेक झाली आणि सचिन पाजी माझ्याकडे आले. मी संघात नवीन होतो म्हणून ते मला मजाक करत बोलत असायचे. ते मला म्हणाले की, इरफान कसे वाटत आहे? पाजी खुप छान, असे मी उत्तर दिले. आपल्याला फलंदाजी करायची आहे. चांगला खेळ, असे पाजी पुढे मला म्हणाले. त्यावर मी त्यांना विचारले खरंच फलंदाजी करायची आहे का? तर ते मजा घेत हो हो म्हणाले.”
“खरं तर त्यावेळी भारतीय संघाने गोलंदाजी करायचे ठरवले होते. सचिनला अप्रत्यक्षपणे मला म्हणायचे की, तू एवढं जेवन केल आहेस मग तू गोलंदाजी कशी करणार. विशेष म्हणजे त्यावेळी मलाच पहिले षटक गोलंदाजी करायची होती. तेव्हा मला माझीच लाज वाटली. म्हणून मी जेव्हाही पाजी माझ्याकडे यायचे, मी त्यांच्यापासून दूर निघून जायचो.”
“मी कमीत कमी १ वर्ष त्यांच्यासोबत बसून जेवन केले नव्हते. एका दिवशी पाजी मला त्यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेले होते. तेव्हा मी त्यांच्यासोबत बसून जेवलो,” असे इरफान पुढे म्हणाला.
इरफान, युसुफ आणि कपिल शर्मा यांनी शोमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
कोहलीशी तुलना होणारा खेळाडू पाकिस्तानचा नवा कर्णधार
आयसीसीच्या त्या एका ट्विटने सचिनला आली ‘दादी’ची आठवण
दोन विश्वचषकात चांगली कामगिरी करुनही २०१४मध्ये माझ्या घरावर फेकले होते…