---Advertisement---

‘निष्पापाला हानी म्हणजे मानवतेला हानी’, उदयपूरच्या घटनेवर इरफान पठाण संतापला

On: बुधवार, जून 29, 2022 7:22 PM
Irfan-Pathan
---Advertisement---

राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंपी म्हणून काम करणाऱ्या कन्हैया लालच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे, मात्र उदयपूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जगभरातील लोक या विषयावर आपली मते मांडत आहेत. त्यापैकी एक माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण देखील आहे.

आपल्या परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इरफान पठाणने याला मानवतेची हत्या म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणात एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने, “तुम्ही कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता याने काही फरक पडत नाही. एखाद्या निष्पापाच्या जीवाला हानी पोहोचवणे म्हणजे मानवतेला हानी पोहोचवणे होय.” असे इरफानने स्पष्टपणे म्हंटले आहे. इरफानच्या या ट्वीटमुळे त्याला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे.

उदयपूरच्या कन्हैया लालची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेत्या नुपूर शर्मा वादात सापडल्या होत्या. नुपूरच्या समर्थनार्थ दुकानदाराच्या ८ वर्षांच्या मुलाने चुकून आपल्या मोबाईलवर पोस्ट शेअर केल्याचे सांगितले जात आहे. शिवाय गौस मोहम्मद आणि मोहम्मद रियाज अशी आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पहिल्या सामन्यात महागडा ठरला, तरीही उमरानकडे का दिले विसावे षटक? कर्णधार हार्दिकचा खुलासा

मोईन अलीने टाकली बीसीसीआयसमोर फिरकी! म्हणाला ‘भारताचे नेतृत्व पुन्हा विराट कोहलीकडे द्यायला हवे’

एवढी मोठी धावसंख्या केली, तरीही टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम; वाचा काय घडले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---