---Advertisement---

 विराटचा चमचा म्हणून संबोधल्यानंतर इरफान पठाणने दिले चाहत्याला ‘असे’ सडेतोड उत्तर

On: शनिवार, जून 26, 2021 2:23 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या समालोचन करताना दिसतो. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांदरम्यान स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन केले होते. यादरम्यान त्याने क्रिकेट तज्ञ म्हणून फलंदाज आणि गोलंदाजांवर आपले मत व्यक्त केले. इरफान पठाणने एका कार्यक्रमादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले. परंतु, काही चाहत्यांना इरफान पठाणची ही गोष्ट आवडली नाही.

इरफान पठाणच्या या प्रतिक्रियेवर एका चाहत्यानी म्हटले की, तो विराट कोहलीचा चमचा आहे. त्यानंतर इरफान पठाणने चाहत्याला प्रत्युत्तर दिले.

आर. दत्ता नावाच्या एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, ‘इरफान पठाणला समालोचन करण्यासाठी पैसे मिळतात का विराट कोहलीचे कौतुक करण्यासाठी? चमचागिरीची पण एक हद्द असते.’ याचे उत्तर इरफान पठाणने दिले की, ‘मग तुम्ही मला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे कौतुक करताना पाहू इच्छित नाही का? ‘

Photo Courtesy: Twitter/@IrfanPathan

अंतिम सामन्यात पराभव
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये विराट कोहलीची उत्कृष्ट फलंदाजी झाली नाही. पहिल्या डावात विराट कोहली 44 धावा करत बाद झाला. दुसऱ्या डावामध्ये विराट 13 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे दोन्ही डावांमध्ये विराट कोहलीला काइल जेमिसनने बाद केले. काइल जेमिसन हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या संघाकडून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळतो.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विराटची कामगिरी
विराट कोहली जगातील पहिल्या पाच कसोटी फलंदाजांच्या यादीत येतो. परंतु, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विराट कोहली त्याच्याकडून असलेल्या अपेक्षेप्रमाणे लयीत दिसून आला नाही. त्याने 15 सामन्यांमध्ये 42.45 च्या सरासरीने 934 धावा बनविल्या. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतक झळकावली आहेत. पण, कर्णधार म्हणून त्याने चांगले नेतृत्व केले. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा मान मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२० दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला नजर कमजोर असल्याची झाली जाणीव, करावी लागली शस्त्रक्रिया

साक्षी धोनीने शेअर केला हिमाचलचा मनमोहक व्हिडिओ; अनुष्का शर्मा, धनश्री वर्माने दिल्या खास प्रतिक्रिया

कमालीचे अष्टपैलू खेळाडू! व्हीव्हीएस लक्ष्मणने वेगवेगळ्या काळातील ‘या’ दोन खेळाडूंचे केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---