क्रिकेटजगतात जेव्हाही सर्वात महान अष्टपैलू खेळाडू कोण या गोष्टीवर चर्चा होते, तेव्हा दोन व्यक्तींची नावे समोर येतात, ते म्हणजे गॅरी सोबर्स आणि जॅक कॅलिस. सोबर्स 60 व्या दशकातील हिरो होते. तर कॅलिस यांनी 2000 च्या दशकामध्ये सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रदर्शन केले.
सोबर्स अशा काळात वेस्ट इंडिजसाठी खेळले, जिथे खेळपट्टीवर चेंडू खूप वळत होता किंवा वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळत होती. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यावेळी वेस्टइंडीजचे संपूर्ण विश्वावर वर्चस्व होते. दरम्यान, कॅलिसने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक फलंदाजीतून योगदान दिले; परंतु, जेव्हा कर्णधारला त्यांच्या गोलंदाजीची गरज भासे, तेव्हा त्यांनी वेगवान गोलंदाज म्हणूनही भरीव कामगिरी केली.
नुकतेच भारत आणि न्यूझीलंड यांच्य मधील आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सने एक मतदान घेतले होते. यावेळी अष्टपैलू खेळाडूच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू कॅलिस यांची बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन आणि एंड्रयू फ्लिंटॉफ यांच्या तुलनेत कसोटीमधील २१ व्या शतकातील सर्वात महान अष्टपैलू म्हणून निवड झाली.
भारतीय संघाचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू कॅलिसचे कौतुक केले. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, “खूप सोपे आहे, कारण जॅक कॅलिस एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो नेहमीत सर्वकालिन उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक दावेदार आहे आणि त्यानंतरही तुम्ही पाहता त्याच्या नावे 200 पेक्षा अधिक विकेट आहेत. स्लिपमध्ये त्याने अनेक झेल पकडले आहेत. गॅरी सोबर्स यांच्याबद्दल मी सनी भाई आणि सर्व महान खेळाडूंकडून खूप काही गोष्टी ऐकल्या आहेत. यामुळेच मी माझ्या पिढीतील ज्या खेळाडूंच्या विरुद्ध खेळलो आहे किंवा ज्यांना मी पाहिले आहे मला असे वाटत आहे की, जॅक्स कैलिस आणि गॅरी सोबर्स हे दोघेही खेळाडूसारखेच आहेत. ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत.”
कॅलिसने 1995 ते 2014 या कालावधीत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 577 विकेट्स घेतल्या आहेत. तर 25534 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी कसोटीत सर्वाधिक 23 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. तर गॅरी सोबर्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत 94 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 8032 धावा केल्या आहेत आणि 236 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
‘विराटशी मैदानात वाद घालण्याचा भानगडीत मी पडणार नाही’, टीम इंडियाच्या युवा खेळाडूची प्रतिक्रिया
जबरदस्त! गुडघ्यावर बसून फलंदाजाने मारला अनोख्या अंदाजात षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल २०२१ नंतर दोनच दिवसांनी सुरू होणार टी२० विश्वचषकाचा थरार, ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना






