एशिया कप (Asia Cup) २०२२च्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक आहेत. यंदा या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला दिले गेले आहेत. तर ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे खेळवली जाणार आहे. यातील अतिमहत्वाच्या आणि क्रिकेट विश्वातील चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे तो सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेआधीच शनिवारी (२० ऑगस्ट) पाकिस्तानला मोठा धक्का बसला. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. यावरून सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही संघाच्या माजी खेळाडूंनी उडी घेतली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामन्याला अजून एक आठवडा शिल्लक आहे त्यातच दुसरा एक सामना सुरू झाला आहे. तो म्हणजे दोन्ही संघातील माजी क्रिकेटपटूच्या ट्वीट्सचा. शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्या संघातून बाहेर पडण्याने एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूस (Waqar Younis) याने शाहीनच्या बाहेर जाण्याने भारतीय संघाची काळजी मिटली असेल असे मत व्यक्त करणारे ट्वीट केले होते. तर भारताच्या अष्टपैलू इरफान पठाणनेही त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
इरफान पठाण (Irfan Pathan)याने ट्वीट करत म्हटले, ‘दुसऱ्या संघांसाठी चांगली गोष्ट ही की जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल एशिया कपमध्ये खेळत नाही.’ त्याचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.
https://twitter.com/IrfanPathan/status/1561281637018910720?s=20&t=ATXq7cytnIXMnkprzk5Sxw
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर ( यानेही पठाणच्या ट्वीटला रीट्वीट करताना एक मीम ट्वीट करत म्हटले, ‘चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया.’ भारताच्या या दोन्ही खेळाडूंच्या ट्वीटचे चाहत्यांनी मजा घेत पाकिस्तानला चांगलेच ट्रोल केले आहे.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1561285504934367232?s=20&t=iF3s6PxvcBiA26zD1UH0ew
शाहीनने २०२१च्या टी२० विश्वचषकात त्याच्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघाला अडचणीत आणले होते. त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या तिघांच्याही विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने १० विकेट्सने गमावला होता.
शाहीन संघातून बाहेर झाल्याने भारताच्या वरच्या फळीला धीर आला असेल, असे ट्वीट वकार यांनी केले होते.
https://twitter.com/waqyounis99/status/1561001177445269504?s=20&t=XVmvKkJlRsGLm-vfFfiseQ
भारताचा जसप्रीत बुमराह हा पण दुखापतीमुळे एशिया कपला मुकला आहे. त्याचबरोबर हर्षल पटेल देखील दुखापतग्रस्त आहे. अशात भारतीय संघात आवेश खान आणि अर्शदीप सिंग या नवख्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण





