---Advertisement---

आयपीएल नव्हे, तर ‘या’ टी२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार पठाण बंधू

On: मंगळवार, जुलै 6, 2021 12:01 PM
---Advertisement---

क्रिकेट चाहत्यांच्या आनंदांत लवकरच भर पडणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयपीएल २०२१ स्पर्धेचा उर्वरित हंगाम यूएईमध्ये खेळवला जाणार आह. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू तुफान फटकेबाजी करताना दिसून येणार आहे. तत्पूर्वी आणखी एक मोठी क्रिकेट स्पर्धा क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत.

पुन्हा एकदा दिसणार पठाण पॉवर 
येत्या ३० जुलैपासून लंका प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २२ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेत इरफान पठाण आणि युसूफ पठाण हे दोघेही बंधू खेळताना दिसून येणार आहेत.  गतवर्षी झालेल्या लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या हंगामात डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हा कँडी फ्रेंचायजीसाठी खेळताना दिसून आला  होता.

त्यागी आणि बिस्ला देखील होणार सहभागी
तसेच इतर खेळाडूही या स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात. परंतु अजूनपर्यंत सर्व खेळाडूंची नाव समोर आले नाही. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी फ्रेंचायजीचे म्हणणे आहे की, लीग सुरु होण्यापूर्वी कुठल्याही खेळाडूचे नाव जाहीर केले जाणार नाही. कारण, बीसीसीआय भारतीय खेळाडूंना परदेशी लीग स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहित करत नाही. सुदीप त्यागी आणि मनविंदर बिस्ला यांनी आयएएनएसला माहिती दिली आहे की, त्यांनी लंका प्रीमियर लीग स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे.

लंका प्रीमियर लीग  २०२० स्पर्धेत खेळले होते भारतीय खेळाडू 
गतवर्षी झालेल्या लंका प्रिमीयर लीग स्पर्धेत इरफान पठाण, त्यागी आणि मुनाफ पटेल यांनी सहभाग घेतला होता. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना परदेशी लीग स्पर्धा खेळण्याची अनुमती देत नाही, जर या खेळाडूंना परदेशी लीग स्पर्धा खेळायची असेल तर त्यांना बीसीसीआय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावा लागते. (Irfan Pathan, Yusuf Pathan, Sudeep Tyagi, Manvindar Bisla registered himself for Lanka Premier League )

स्मित पटेलने जाहीर केली निवृत्ती 
१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा खेळलेला माजी भारतीय खेळाडू स्मित पटेल याने गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. स्मित पटेलने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत गोवा आणि गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा आणि अमेरिका क्लब क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

महत्वाच्या बातम्या –

‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ

इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यांमध्ये अडकला पृथ्वी शॉ, माजी क्रिकेटपटू जाफरने शेअर केलेले ‘ते’ मीम जोरदार व्हायरल

श्रीलंका क्रिकेटमधील दुष्टचक्र थांबेना, आता सापडले मॅच फिक्सिंगच्या विळख्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---