कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा दबाव व त्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता असेल तर, फलंदाजी करणारा संघ निराश व गोलंदाजी करणारा संघ आनंदात असतो. शक्यतो अशा परिस्थितीतून फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची संधी अत्यंत कमी असते. मात्र, आयर्लंडच्या फलंदाजाने ही स्वप्नवत गोष्ट खरी करून दाखवत अखेरच्या षटकात सलग सहा षटकार मारून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले.
आयर्लंडमधील प्रतिष्ठित लगान व्हॅली स्टील टी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही अविस्मरणीय घटना घडली. बालीमेना व क्रेगाघो यांच्यातील अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात ३५ धावांची गरज असताना बालीमेनाचा कर्णधार जॉन ग्लास याने हा पराक्रम करून दाखवला. त्याच्या या फटकेबाजीनंतरच्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अंतिम षटकात ठोकले सहा षटकार
आयर्लंडमधील नॉदर्न क्रिकेट युनियनची महत्त्वपूर्ण स्पर्धा असलेल्या लगान व्हॅली स्टील टी २० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बालीमेना व क्रेगाघो हे संघ आमनेसामने होते. क्रेगाघोने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात जे हंटर व जॉनी मूरी यांच्या योगदानामुळे १४७ धावांचा टप्पा गाठला. जॉन ग्लास याचा मोठा भाऊ सॅम ग्लासने हॅट्रिक नोंदवली.
क्रेगाघोने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बालीमेना संघाची अवस्था १९ षटकात ७ बाद ११३ अशी झालेली. संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात ३५ धावा हव्या होत्या. या अंतिम सामन्यात बालीमेना संघाचे नेतृत्व करत असलेल्या जॉन ग्लास याने अंतिम षटकात सर्व चेंडूवर षटकार वसूल करत संघाला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. ग्लास ८७ धावांवर नाबाद राहिला. सामनावीर म्हणून त्याचीच निवड करण्यात आली.
JOHN GLASS TAKE A BOW!
He has just hit 36 off the final over and Ballymena are the 2021 Lagan Valley Steels 2021 champions.
What an innings from the skipper. #ncut20t pic.twitter.com/afatC6Q7co
— Northern Cricket Union (@NCU_News) July 15, 2021
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यांनी केला आहे पराक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ तीन फलंदाजांना सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्यात यश आले आहे. २००७ वनडे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्स याने तर, याच वर्षी झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात भारताच्या युवराज सिंग याने सलग सहा षटकार खेचले होते. २०२१ मध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने श्रीलंकेचा फिरकीपटू अखीला धनंजया याच्या षटकात सहा षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघ डरहॅमला आले एकत्र; रोहित म्हणाला, ‘सुटी संपली, आता कामाला सुरुवात’
लुईसच्या वादळात उडाली ऑस्ट्रेलिया; टी२० मालिकेत ४-१ अशी सरशी साधत वेस्ट इंडिजने दाखवला दम
भारत-श्रीलंका येणार आमने-सामने, ‘अशी’ आहे दोन्ही संघांची वनडेतील एकमेकांविरुद्धची कामगिरी