---Advertisement---

IND vs ENG : डॉन ब्रॅडमनचा विक्रम धोक्यात, यशस्वी जयस्वाल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर!

On: गुरूवार, जून 26, 2025 6:43 PM
---Advertisement---

भारत- इंग्लंड (IND vs ENG) संघामध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून खेळला जाणार आहे. याआधी लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्या मालिकेविषयी टीम इंडियाच्या पराभवाबद्दल कोणीही विचार केला नसेल. पण शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या सलामी जोडीने शानदार भागीदारी रचून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला, इंग्लड मालिकेत 1-0 ने आघाडी घेण्यात यशस्वी ठरला.

त्याच्या शानदार प्रदर्शनातून चाहत्यांच्या मनावर राज्य करत असलेला भारतीय कसोटी संघातील युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने (Yashsvi Jaiswal) इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या आतापर्यंतच्या 11 डावांमध्ये 817 धावा केल्या आहेत आणि आता तो 1000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 183 धावांची गरज आहे, जर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावांमध्ये तो जर ही यशस्वी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर भारतासोबतच, जयस्वालच नाव इतिहासाच्या पानांमध्ये खास ठिकाणी झळकलं जाईल.

जयस्वालकडे डॉन ब्रॅडमन (Don Bradman) सारख्या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध सर्वात वेगाने 1000 धावा करण्याचा विक्रम सध्या ब्रॅडमॅनच्या नावावर आहे. त्याने फक्त 13 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत 11 डाव खेळलेले आहेत आणि त्याच्याकडे 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त एक डाव राहिलेला आहे. जर त्याने 183 धावा केल्या तर तो ब्रँडमॅन पेक्षा सुद्धा वेगाने हा विक्रम करेल, जी क्रिकेट इतिहासात एक मोठा खास कामगिरी मानली जाईल.

यशस्वी जयस्वालने इंग्लंड सारख्या मजबूत संघाविरुद्ध धावा केलेल्या आहेत आणि त्यातून हे दिसून येत की, तो मोठ्या काळासाठी भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून राहू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---