इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या सर्वांनी चांगली कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने या कसोटी सामन्यात 9 बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि सिराज देखील उत्कृष्ट लयीत दिसले. मात्र या सामन्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आले आहे. कारण सिराजने त्याच्या घातक गोलंदाजीने कर्णधार विराट कोहलीचे मन जिंकले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांना चेंडू आणि जीभ या दोन्ही अस्त्रांनी जेरीस आणले आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान पक्के केले. अशा परिस्थितीत इशांत उर्वरित सामन्यातही भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर राहण्याची शक्यता आहे.
कर्णधार विराट कोहलीने अनुभवी वेगवान गोलंदाज इशांतला इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज सिराजला निवडले होते. सिराजने कर्णधार कोहलीच्या या निर्णयाचे सोने केले. नॉटिंघम कसोटीतील त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्याने या सामन्यात एकूण 3 बळी घेतले आहेत. त्यामुळे पुढील सामन्यातही कोहली सिराजवरच वेगवान गोलंदाजीची जबाबदारी टाकताना दिसेल, हे जवळपास निश्चित आहे.
सिराजने नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांना त्याच्या वेगाने आणि लयीने त्रस्त केले. तो फक्त 3 विकेट घेण्यात यशस्वी झाला असला तरी, पण तो त्याच्या स्पेलमुळे खूपच धोकादायक दिसत होता. त्याच्या अचूक गोलंदाजीने त्याने यजमान संघाला खूप अडचणीत टाकले होते.
ईशांत शंभरपेक्षा जास्त कसोटी सामने (102 कसोटी सामने) खेळला आहे आणि तो अनुभवानेही सिराजपेक्षा जास्त वरचढ आहे यात शंका नाही. परंतु सध्या कर्णधार कोहली आणि संघ व्यवस्थापन सिराजला प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवण्याची चूक करू शकत नाही.
यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवून ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकला होता. त्यामध्ये सिराजचे मोठे योगदान होते. पदार्पण कसोटी मालिकेत दमदार खेळ दाखवत त्याने केवळ तीन कसोटी सामन्यांमध्ये 29.54 च्या सरासरीने एकूण 13 बळी घेतले होते. या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२व्या वर्षी सीएसकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतली हॅट्रिक, रचला इतिहास
थाला इज बॅक! धोनीचे चेन्नई विमानतळावर आगमन, व्हिडिओ आणि फोटो होतायेत जोरदार व्हायरल
टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; विलियम्सनकडे नेतृत्त्वपद, तर ‘या’ खेळाडूंना मिळाली जागा






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा