भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवली जात आहे. ज्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गाबामधील ढगाळ वातावरण लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला. मात्र, रोहितने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडून चूक केली. असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारख्या गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल असे रोहितला वाटत होते पण पहिल्या सत्रात तसे काही दिसले नाही.
पहिल्या सत्रात दोनदा पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे जास्त षटकेही खेळता आली नाहीत. ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. गेल्या काही वर्षांत गाबा येथे कांगारुंचा दोनदा पराभव झाला आहे. 2021 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तर वेस्ट इंडिजने या वर्षाच्या या ठिकाणी सामना जिंकला. ब्रिस्बेनमध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1985 पासून ऑस्ट्रेलियाने एकही कसोटी गमावलेली नाही. कमिन्सचा आनंद गाबा रेकॉर्डमध्ये दडलेला असल्याचे वॉनने सांगितले.
फाॅक्स क्रिकेटशी बोलतान मायकेल वॉन म्हणाला, हा टाॅस त्यांच्या (ऑस्ट्रेलिया) बाजूने होता. ज्या ठिकाणी मला वाटले की, टाॅस हरल्यानंतही पॅट कमिन्स आनंदी होता. त्याला निर्णय घेण्याची गरज पडली नाही. या मैदानाच्या इतिहासामुळे ते फलंदाजी निवडतील, असे मला वाटले. पण रोहित शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेताच. पॅट कमिन्स आनंदी झाला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रेंडन ज्युलियननेही वॉनशी सहमती दर्शवली. तो म्हणाला की कमिन्सने नाणेफेक गमावणे चांगले होते”.
ज्युलियन म्हणाला, “नाणेफेक गमावणे चांगले होते. मला वाटते की या कसोटीपूर्वी खूप पाऊस पडला होता आणि जेव्हा खेळाडू सराव सत्रासाठी मैदानात आले तेव्हा त्यांना मैदान हिरवेगार असल्याचे दिसले. पण आज सकाळी मी विचार केला नाही. की आधी गोलंदाजी करणे चांगले होईल”.
गाबा कसोटीसाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला तर वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. पहिल्या सत्राअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 13.2 षटकांत 28/0 अशी होती. पावसामुळे लंच ब्रेक लवकर घेण्यात आला. सहाव्या षटकातही रिमझिम पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पहिल्या दिवशी पावसाची संततधार हवामान खात्याने वर्तवली होती.
हेही वाचा-
24 तासांत आणखी एका पाकिस्तानी दिग्गजाची निवृत्ती, दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही, PCB ने अशी केली आपली मागणी पूर्ण
पाकिस्तानची पराभवांची मालिका सुरूच, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका बनला तिसरा संघ