सोमवारी (दि. २५ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ३८वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघात पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने चेन्नईविरुद्ध ११ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात तब्बल ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऋषी धवनने कमालच केली. त्याने या सामन्यात खेळताना २ विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे, मागील वेळीही ऋषी पंजाब किंग्स (तेव्हाचे किंग्स इलेव्हन पंजाब) संघाकडूनच खेळला होता. मात्र, २०१७मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात घेतले होते, पण त्याला खेळण्याची एकही संधी दिली नाही.
अशात पंजाब संघात एक नाही, तर दोन धवन नावाचे खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, हे दोघेही भाऊ-भाऊ आहेत की काय? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. (Let’s Know Is Rishi And Shikhar Dhawan Are Brothers)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
हिमाचल प्रदेशचा रहिवासी असलेल्या ऋषी धवनने (Rishi Dhawan) मागील वर्षी आपल्या घरगुती संघाला विजय हजार ट्रॉफीचा किताब जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी कमाल केल्यानंतर धवनला आयपीएल २०२२मध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने २०१३मध्ये मुंबई इंडियन्सकडून आपला पहिला आयपीएल सामना खेळला होता.
काय आहे ऋषी धवन आणि शिखर धवनचं नातं?
चेन्नईच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चिंतेत टाकणाऱ्या ऋषीला भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच (Shikhar Dhawan) भाऊ असल्याचे म्हणले जात आहे. ऋषी धवन आणि पंजाब किंग्सचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनची चांगलीच चर्चा रंगलीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ऋषी आणि शिखर धवनबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्यात कोणतंही नातं नाहीये. ऋषीचा जन्म हिमाचल प्रदेशचा आहे, तर शिखरचा दिल्लीतील आहे. आयपीएल २०२२मध्ये एकाच संघाकडून खेळण्याव्यतिरिक्त दोघेही खेळाडू भारतीय संघासाठी ३ वनडे सामन्यात एकत्र खेळले आहेत.
एकीकडे शिखर धवनला कोणताही भाऊ नाहीये, तर दुसरीकडे ऋषी धवनला एक मोठा भाऊ आहे. त्याचे नाव राघव धवन आहे. कदाचित खूप कमी चाहत्यांना माहिती असेल की, राघवदेखील क्रिकेटपटू आहे आणि तो हिमाचल प्रदेशसाठी खेळतो.
ऋषी धवनची आयपीएल कारकीर्द
ऋषीच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २७ सामने खेळताना ३३.९५च्या सरासरीने आणि ७.९६च्या इकॉनॉमी रेटने २० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी १४ धावा देत २ विकेट्स घेणे ही आहे. ही कामगिरी त्याने आयपीएल २०१४मध्ये केली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याचीच कमी भासतेय’, चेन्नईच्या ६ व्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने सांगितली संघातील कमजोरी
शिखर धवनचे विक्रमी अर्धशतक! चेन्नईविरुद्ध ८८ धावा ठोकत विराट, रोहितच्या पंक्तीत स्थान
IPL| चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्यात पंजाब दुसऱ्या क्रमांकावर, यादीत ‘हा’ संघ अव्वल