भारतीय संघ सध्या कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाही. कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्वच स्तरावरील क्रिकेट सध्या ठप्प झालं आहे. यामुळे सतत क्रिकेटमध्ये व्यस्त असलेल्या भारतीय खेळाडूंना मोठी विश्रांती मिळणार आहे.
भारतीय संघ या विश्रांतीच्या काही आठवडे आधी न्यूझीलंडमधून वनडे व कसोटी मालिकेत सपाटून मार खाऊन आला आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील अव्वल फलंदाज असलेल्या विराटच्या कर्णधारपदावर शंका घेतल्या जात आहेत.
परंतु निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी मात्र याला पाठींबा दिलेला नाही. “कर्णधार असताना विराटची कामगिरी अजिबात ढासळली नाही. जर आपला कर्णधार सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज असेल तर काहीही शंका असता कामा नये. त्याने आखलेली रननीती तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाची असते. ” असे प्रसाद यांनी सांगितले.
विराट काही मालिकांमधून काही महिन्यांनंतर विश्रांती घेत असतो. तेव्हा संघाची कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे जाते. विशेष म्हणजे रोहितनेही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार असताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहितकडे देण्याची मागणी सतत विविध स्तरांवरुन होते. परंतु भारतीय संघाचे जेव्हा जेव्हा वेगळे कर्णधार राहिले आहे तेव्हा तेव्हा भारतीय संघाची कामगिरी खालवल्याचा इतिहास आहे.
रोहितने मुंबई इंडियन्सकडून खेळताना कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच अनेक दबावाच्या वेळी चांगल्या खेळी केल्या आहेत. मुंबईला विजेतेपद मिळवुन देण्यात रोहितचा मोठा वाटा आहे. तर दुसऱ्या बाजूला विराट ज्या संघाचं नेतृत्त्व करतो त्या बेंगलोरला एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही.
ट्रेंडिग घडामोडी-
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
– आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
– विराटने तेव्हा केलेला राडा ऑस्ट्रेलिया आजही विसरली नाही
– संंपुर्ण यादी: असा येतो बीसीसीआयच्या तिजोरीत पैसा