---Advertisement---

वाढदिवशी सोढी नडणार विराट सेनेला! नेहमीच केलीय जबरदस्त कामगिरी

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 4:54 PM
---Advertisement---

युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे ब गटातील संघ आमने-सामने येणार आहेत. आपल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागल्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. भारतीय संघ या सामन्यात विजयाचा दावेदार मानला जात असला तरी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांपासून भारतीय फलंदाजांना सावध राहावे लागेल. न्यूझीलंडच्या संघात दर्जेदार वेगवान गोलंदाज असले तरी, फिरकीची बाजू सांभाळणाऱ्या ईश सोढीवर आपल्या वाढदिवशी संघाला विजयी करण्याची जबाबदारी असेल.

वाढदिवशी शानदार कामगिरी करण्याचा सोढीचा प्रयत्न
न्यूझीलंड संघातील एकमेव लेगस्पिनर ईश सोढी रविवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे सोढी हा भारतीय वंशाचा असून त्याचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला होता. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी, सोढीने अप्रतिम कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ २८ धावा देऊन दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. तसेच सर्व सामन्यातही त्याने देखणी कामगिरी केलेली. त्यामुळे या सामन्यातही त्याच्यावर सर्व न्यूझीलंडच्या प्रेक्षकांचा नजरा असतील.

भारताविरुद्ध केली आहेत दमदार कामगिरी
ईश सोढी याने भारतीय संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच सरस कामगिरी केली आहे. त्याने भारताविरुद्ध १२ सामने खेळताना १७ गडी बाद केले आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीला त्याने पाच वेळा आपले शिकार बनवले आहे. तसेच संघाचा प्रमुख फलंदाज केएल राहुल हा देखील दोन वेळा त्याच्या चेंडूंवर बाद झाला आहे. सोढी याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली असता त्याने ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७५ बळी मिळवले आहेत. तसेच तो काही काळ गोलंदाजांच्या टी२० क्रमवारीत पहिल्या स्थानी होता. एकूण टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या नावे १८५ सामन्यांत २०५ बळी जमा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात ‘या’ पंचामुळे विराटसेनेचे फिरणार ग्रह? यापूर्वी ४ विश्वचषकात नडलाय

गोंडस चिमुकल्यांच्या गर्दीत ‘परी’ वामिकाने वेधले लक्ष; हॅलोविनदिवशी भारतीय खेळाडूंची मस्ती

तब्बल १९ वर्ष जुना इतिहास बदलण्याची ‘टीम इंडिया’ला संधी; गांगुलीनंतर विराट बनू शकतो ‘असा’ कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---