---Advertisement---

आयपीएल २०२०साठी राजस्थान रॉयल्समध्ये इश सोधीचा समावेश, पण खेळाडू म्हणून नाही तर…

On: गुरूवार, जानेवारी 2, 2020 7:16 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 साठी नुकताच 19 डिसेंबरला लिलाव पार पडला. या लिलावात न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोधीला कोणत्याही संघाने पसंती दाखवली नव्हती. असे असले तरी आता मात्र त्याची राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2020 साठी फिरकी गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.

सोधी राजस्थान रॉयल्स संघात गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लश मॅकक्रम यांच्याबरोबर काम करेल.

27 वर्षीय सोधी राजस्थानकडून 2018 आणि 2019 च्या आयपीएल मोसमात खेळला आहे. पण 2020 आयपीएल लिलावाआधी त्याला राजस्थानने मुक्त केले होते. मात्र त्याच्यावर या लिलावात कोणीही बोली लावली नाही. त्याची 75 लाख ही मुळ किंमत होती.

त्याने आयपीएलमध्ये 8 सामने खेळले असून त्यात त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत.

आता राजस्थानबरोबर फिरकी गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम करण्याबद्दल सोधी म्हणाला, ‘मी राजस्थानकडून दोन मोसम खेळलो असल्याने मी संघाशी जोडलेल्या व्यक्तींना चांगले जाणतो. ते मला नेहमीच पाठिंबा देतात.’

‘त्यामुळे जेव्हा मला राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाकडून या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा मला होकार देण्यासाठी दोनदा विचार करण्याची गरज पडली नाही.’

तसेच तो असेही म्हणाला की ‘ही एक उत्तम संधी आहे. एवढ्या तरुण वयात कोचिंग (प्रशिक्षक) स्टाफबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे, त्यातून मी खूप गोष्टी शिकेल.’

तो सध्या न्यूधीलंड संघाचा भाग असून त्याने न्यूझीलंडकडून आत्तापर्यंत 17 कसोटी आणि 31 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत 41 आणि वनडेत 39 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---