न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना शनिवारी (दि. 23 सप्टेंबर) ढाका येथे पार पडला. हा सामना न्यूझीलंड संघाने 86 धावांनी जिंकला. असे असले, तरीही हा सामना एका वेगळ्याच कारणामुळे भलताच चर्चेत आहे. खरं तर, या सामन्यादरम्यान बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूदने मंकडींग पद्धतीने ईश सोधी याला बाद केल्यानंतर कर्णधार लिटन दास याने त्याला फलंदाजीसाठी माघारी बोलावले. लिटनच्या या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, सोधीनेही शानदार गोलंदाजी करत 10 षटकात 6 विकेट्स घेतल्या. यामुळे न्यूझीलंडला सहजरीत्या विजय साकारता आला. या सामन्यानंतर सोधीने मंकडींगविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
‘जर मी गोलंदाज असतो तर…’
ईश सोधी (Ish Sodhi) म्हणाला की, तो क्रीझच्या बाहेर पडताना त्याला अस्वस्थ वाटत होते, पण बांगलादेशच्या खिलाडूवृत्तीने त्याला प्रभावित केले. तो म्हणाला, “आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडू आहोत. तुम्हाला तुमच्या देशासाठी विजय मिळवायचा असतो, त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी समोर येतात. मला वाटते की, हे बांगलादेशने केलेले महान काम होते. त्यांनी वास्तवात हे खूप चांगल्याप्रकारे सांभाळले. जर मी गोलंदाज असतो, तर हेच केले असते.”
WOW! SOME DRAMA IN DHAKA 👀
Hasan Mehmud ran Ish Sodhi out via Mankad but Bangladesh captain Litton Das asked Sodhi to come back and carry on batting. Absolute scenes. This is sportsmanship 🇧🇩🇳🇿♥️♥️ #BANvNZ pic.twitter.com/L2RN3wdMhf
— Farid Khan (@_FaridKhan) September 23, 2023
‘त्यांनी जबरदस्त खिलाडूवृत्ती दाखवली’
सोधी पुढे बोलताना म्हणाला, “आम्ही सर्व क्रिकेट खेळाचा खूप सन्मान करतो. आम्ही या खिळाडूवृत्तीला कायम ठेण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे की, हा खेळ आता नियमांचा भाग आहे. तुम्ही हे सर्व जगात पाहिले आहे. मात्र, हा थोडा वादग्रस्त मुद्दाही आहे. ते सहजरीत्या मला जाऊ देऊ शकत होते, पण त्यांनी तिथे जबरदस्त खिलाडूवृत्ती दाखवली.”
HIGHLIGHTS | Catch up on all the highlights from this evenings 86-run win in Dhaka 📺
WATCH | https://t.co/Q8gPZSt9Qs#BANvNZ #CricketNation pic.twitter.com/qBKtoZzEca
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 23, 2023
“आम्ही विजेता संघ बनल्यामुळे भाग्यवान आहोत. मात्र, खिलाडूवृत्ती जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे. खासकरून जेव्हा आपण आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी असे प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळत आहोत,” असे सामन्यात 10 षटकात 39 धावा खर्च करून 6 विकेट्स घेणारा सोधी पुढे म्हणाला.
खरं तर, नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाजाला धावबाद करण्यासाठी मंकडींगबाबत नियम बनवला गेला आहे. त्यामुळे सोधी बाद झाला असता. हसन महमूद हा अशाप्रकारे विकेट घेणारा 14वा खेळाडू बनू शकला असता. मात्र, लिटन दास याने हा निर्णय मागे घेत जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. (ish sodhi on mankading run out by hasan mahmud in ban vs nz match said this)
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया एक पाऊल दूर, पण कशी असेल इंदोरची खेळपट्टी आणि हवामान?
भारतात डी कॉक खेळणार शेवटचा वनडे विश्वचषक! पाहा मागच्या दोन हंगामांमधील यष्टीरक्षक फलंदाजे रेकॉर्ड्स