---Advertisement---

न्यूझीलंडचा हा खेळाडू घेतोय भारतीय गोलंदाजांकडून गोलंदाजीचे धडे

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2020 8:19 PM
---Advertisement---

21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी बोलताना न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोधीने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आहे. तसेच त्याने म्हटले आहे की भारतीय गोलंदाज नेहमी मदत करण्यात तयार असतात.

लुधियानामध्ये जन्मलेल्या 27 वर्षीय मनगटी फिरकीपटू सोधीने सांगितले की तो आर अश्विन (R Ashwin), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) आपला मित्र मानतो.

“जेव्हा तुम्ही या खेळाडूंकडून सल्ला किंवा मदत मागता तेव्हा या खेळाडूंबद्दल तुमचा आदर आणखी वाढतो. ते मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच आपला अनुभव सांगण्यासही त्यांना कोणती अडचण नसते,” असे एका मुलाखतीत सोधी म्हणाला.

“चहल एक चांगला व्यक्ती आहे. तो पूर्णपणे वेगळा गोलंदाज आहे. तसेच तो मोठ्या मनाचा खेळाडू आहे. या खेळाडूंबरोबर वेळ घालविणे आणि त्यांचे अनुभव ऐकणे खूप चांगले आहे,” असेही भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना सोधी म्हणाला.

अश्विनच्या गोलंदाजीतील विविधता आणि जडेजाच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो असल्याचे सोधी म्हणाला.

“मी एकेदिवशी जडेजाला त्याच्या सरावाबद्दल विचारत होतो. त्याचबरोबर अश्विन कॅरम बॉल आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा असूनही प्रभावी गुगली टाकतो, याबद्दलही मी त्याला विचारले,” असेही सोधी यावेळी म्हणाला.

सोधी फक्त भारतीय गोलंदाजांबरोबरच नाही तर रिषभ पंतसारख्या (Rishabh Pant) खेळाडूंशीही चर्चा करतो. यांसारखे खेळाडू कोणत्या मानसिकतेने फिरकीपटूंचा सामना करतात, याविषयी त्यांच्याशी चर्चा करून सोधी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

“रिषभ पंत फिरकीपटू गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करणाऱ्यांपैकी एक आहे. मी त्याला विचारेल की, कोणत्या लेंथ बॉलचा सामना करणे सर्वात कठीण असते. फिरकीपटूंविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये पंतसारखा खेळाडू मी आतापर्यंत पाहिला नाही,” असे पंतबद्दल बोलताना सोधी म्हणाला.

सोधीने आतापर्यंत 17 कसोटी, 32 वनडे आणि 45 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत 41 विकेट्स, वनडेत 40 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 53 विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229749694940708864

https://twitter.com/Maha_Sports/status/1229734122895089666

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---