---Advertisement---

इशान किशन, सुर्यकुमारच्या पदार्पणामुळे झाला खास विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारी पहिलीच भारतीय जोडी

On: रविवार, मार्च 14, 2021 9:45 PM
Suryakumar Yadav and Ishan Kishan
---Advertisement---

अहमदाबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या युवा फलंदाज इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांचेही हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे. त्यामुळे एक खास विक्रम झाला आहे.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत आपल्या फलादांजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या या फलंदाजांना गेल्या काही महिन्यांपासून संघात स्थान देण्यासाठी जोरदार मागणी केली जात होती. अखेर त्यांना इंग्लंड विरुद्ध होत असलेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यातून पदार्पण करण्याची संधी मिळाली.

त्यामुळे एकाच टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांची पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी एकाच सामन्यातून २ किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडूंनी टी२०मध्ये पदार्पण केले आहे. मात्र एकाच टी२० सामन्यातून भारताकडून पदार्पण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्यात इशान किशन याला मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनच्या जागी ११ जणांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच सूर्यकुमार यादव याला,अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच सूर्यकुमार यादव मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याची भुमिका पार पाडू शकतो. या दोघांच्याही प्रदर्शनाकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंत रिव्ह्यू सिस्टीम ऍक्टिवेट! अचूक निर्णय घेत डेविड मलानचा अडथळा केला दूर, बघा व्हिडिओ    

Video: चक्क ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता प्रशिक्षक देणार उत्तराखंडच्या जूनियर बुमराहला प्रशिक्षण

कुणीतरी येणार येणार गं..! ‘भज्जी’च्या घरी पुन्हा हालणार पाळणा, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---