सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची मानली जाणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात आहे. गुरुवारी (20 ऑक्टोबर) या स्पर्धेत झारखंड आणि ओडिसा यांच्यात आमना सामना झाला. विक्रम सिंग याच्या नेतृत्वातील झारखंड संघ या सामन्यात 71 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला. झारखंडच्या विजयात इशान किशन याची शतकीय खेळी महत्वाची ठरली. या खेळीच्या जोरावर इशानने एका खास विक्रमची नोंद स्वतःच्या नावापुढे केली आहे.
इशान किशन (Ishan Kishan) सध्या भारतीय संघातून बाहेर आहे, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो स्वतःची झाप सोडताना नक्कीच दिसला. ओडिसा संघाविरुद्ध गुरुवारी त्याने वादळी शतक ठोकले आणि स्वतःच्या नावापुढे एका खास विक्रमाची नोंद देखील केली. इशान किशन आता सय्यत मुश्ताक अली ट्रॉफी () स्पर्धेत ओडिसा संघाविरुद्ध षतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात 64 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी केली आणि ओडिसाविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज म्हणून स्वतःच्या नावावर विक्रम देखील नोंदवला.
यापूर्वी रोहन कदम (Rohan Kadam) याने ओडिसाविरुद्ध सय्यत मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वात मोठी खेळी केली होती, पण आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 2021 मध्ये ओडिसा संघाविरुद्ध 81 धावांची खेळी केली होती. सुभोमय दास (Subhomoy Das) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने नाबाद 79 धावा केल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर श्रीवत्स गोस्वामी (Shreevats Goswami) आहे, ज्याने ओडिसाविरुद्ध 79 धावांची खेळी केली होती.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ओडिसा संघाविरुद्ध सर्वाधिक धावांची खेळी करणारे खेळाडू
102* – इशान किशन (2022)
89 – रोहन कदम (2019)
81 – ऋतुराज गायकवाड (2021)
79* – सुभोमय दास (2007)
79 – श्रीवत्स गोस्वामी (2018)
दरम्यान, ओडिसा आणि झारखंड यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर झारखंडने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या नुकसानावर 188 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ओडिसा संघ 19.2 षटकांमध्ये 117 धावा करून सर्वबाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत स्टॉयनिसला धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहिला का?
कॉनवेने धरलाय यशाचा मार्ग! 92 धावांच्या लाजवाब खेळीने सोडलेय विराट-बाबरला मागे