अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात पदार्पण करणारा इशान किशन हा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सलामीला येऊन महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यासोबतच तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हा पुरस्कार त्याने एका विशेष व्यक्तीला समर्पित केला आहे.
पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंड संघाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या सामन्यात शिखर धवनऐवजी इशानला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने ५६ धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना तो भावूक झाला.
पुरस्कार स्विकारताना तो म्हणाला, “मी या खेळीचे श्रेय माझ्या वरिष्ठ खेळाडूंना देऊ इच्छितो, ज्यांनी मला मैदानात जाऊन माझा स्वाभाविक खेळ खेळण्यास सांगितले होते. एका बलाढ्य संघासमोर टी-२० पदार्पण करणे नक्की सोपे नसते. मुंबई इंडियन्स संघाकडून देखील मला चालना मिळाली आहे.”
या खास व्यक्तीला सामनाविराचा पुरस्कार केला समर्पित
“मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे की, मी शेवटपर्यंत टिकू नाही शकलो. टॉम करनच्या चेंडूवर मारला गेलेला तो षटकार माझ्यासाठी एक अविस्मरणीय शॉट होता. मला माहित नाही मी पुन्हा केव्हा या गोष्टी अनुभवेल. मी भारतीय संघासाठी पदार्पण करत आहे. मी याबद्दल माझे प्रशिधक, वरिष्ठ खेळाडू आणि प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो. ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली. तसेच काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांनीदेखील मला हेच सांगितले होते की, तुला मैदानावर जावं लागेल आणि धावा कराव्या लागतील. यामुळे हा पुरस्कार मी माझ्या प्रशिक्षकाच्या वडिलांना समर्पित करत आहे,” असे शेवटी इशानने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्धशतकासह टी२० क्रिकेटमधील ‘मोठ्या’ विक्रमात विराटची भरारी, रोहितला पछाडत अव्वलस्थानी विराजमान
Video: पंतने मारला ९० मीटरचा खणखणीत षटकार; कोहलीने अलिंगन देतच केलं कौतूक
‘हीच’ होणार जसप्रीत बुमराहची वधूराणी, बॉलिवूड अभिनेत्रीने केला शिक्कामोर्तब