भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने अत्यंत संघर्ष करत हा विजय मिळवला असला तरी, भारताचा युवा यष्टीरक्षक ईशान किशन याने केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर टीका होत आहे.
भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना अष्टपैलू हार्दिक पंड्या याला पंचांनी काहीशा वादग्रस्त पद्धतीने बाद दिले. डॅरिल मिचेल याच्या चेंडूवर हार्दिकला पंचांनी त्रिफळाची त घोषित केले. मात्र, रिप्लेमध्ये स्पष्ट दिसून येत होते की, चेंडू नव्हे तर न्यूझीलंंडचा यष्टीरक्षक टॉम लॅथम याचे ग्लोव्हज लागल्याने बेल्स पडल्या होत्या. तरीही, तिसऱ्या पंचांनी हार्दिकला बाद ठरवले. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पंचांवर अनेकांनी टीका देखील केली.
अगदी अशीच घटना न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी भारताचा यष्टीरक्षक ईशान किशन याने केली. लॅथम फलंदाजीला आल्यावर कुलदीप यादव याच्या पहिल्याच चेंडूवर चकला. किशनने चेंडू अगदी जवळ पकडत ग्लोव्हजने अलगद बेल्स पाडली. त्यामुळे मैदानी पंचांना तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली. तिथे लॅथम नाबाद असल्याचे जाहीर केले गेले. मात्र, या अशा प्रकारच्या खोट्या खेळामुळे ईशानला टीकेचा सामना करावा लागला. तसेच, काहींनी त्याचे समर्थन केले.
Real Indian cricketer ????@ishankishan51 & No 1 Team????@StarSportsIndia @bhogleharsha pic.twitter.com/7TbYfRjfGf
— senthuran (@Senthu_Siva) January 18, 2023
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास शुबमन गिल याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 350 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडने आपले सहा बळी केवळ 131 धावांवर गमावलेले. मात्र, त्यानंतर मायकेल ब्रेसवेलचे शतक व मिचेल सॅंटनरच्या अर्धशतकाने सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. तिथे भारतीय संघ 12 धावांनी विजयी झाला.
(Ishan Kishan Fake Stumping Video Against Newzealand In First ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल
भारताच्या महान फलंदाजांमध्ये शुबमन गिलचेही नाव सामील, सचिनलाही टाकले मागे






