---Advertisement---

वाढदिवशी ‘अशी’ अद्वितीय कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज बनला इशान किशन

On: रविवार, जुलै 18, 2021 10:46 PM
---Advertisement---

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवारपासून (१८ जूलै) श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुंबईचा सूर्यकुमार यादव व झारखंडचा युवा यष्टीरक्षक इशान किशन यांना वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या वाढदिवशी पदार्पणाची संधी मिळालेल्या इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.

वाढदिवशी अर्धशतक झळकावणारा पाचवा भारतीय
रविवारीच इशान किशनने वयाची २३ वर्ष पूर्ण केली. वाढदिवसा दिवशीच त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळाली. तो भारताचा २३५ वा वनडे क्रिकेटपटू बनला. या संधीचा फायदा उठवत त्याने ४२ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा ठोकल्या. अशारीतीने तो आपल्या वाढदिवशी अर्धशतक साजरे करणारा पाचवा भारतीय फलंदाज बनला.

यापूर्वी वाढदिवसाच्या दिवशी अर्धशतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान विनोद कांबळी याने मिळवला होता. त्याने २१ व्या वाढदिवशी ही कामगिरी केलेली. त्यानंतर माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू यांनी ३१ व्या, सचिन तेंडुलकरने २५ व्या, युसुफ पठाणने २६ व्या वाढदिवशी अर्धशतक झळकावलेले. याबरोबरच इशान वाढदिवशी पदार्पण करणारा व अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला.

टी२० मध्येही केले होते धमाकेदार पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडचे तर, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इशानने यावर्षीच मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्ध टी२० पदार्पण केलेले. त्यावेळी देखील त्याने अर्धशतक झळकावलेले. इशान टी२० व वनडे पदार्पणात अर्धशतक झळकावणारा जगातील एकमेव फलंदाज बनला. त्याने आत्तापर्यंत २ टी२० सामन्यात ३० च्या सरासरीने व १४६ च्या स्ट्राईक रेटने ६० धावा बनविल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत इशानने केला मोठा प्रताप, ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पाचवा फलंदाज

शिखरचा ‘गब्बर’ विक्रम! गांगुलीसह विव रिचर्ड्ससारख्या दिग्गजांनाही टाकले मागे

कृणाल पंड्याने मारली असलंकाला मिठी, दिले खिलाडूवृत्तीचे दर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---