---Advertisement---

कृणाल पंड्याने मारली असलंकाला मिठी, दिले खिलाडूवृत्तीचे दर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल

On: रविवार, जुलै 18, 2021 8:33 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा काढत भारतासमोर विजयासाठी ५० षटकांत २६३ धावांचे आव्हान ठेवले. त्याचवेळी श्रीलंकेच्या डावादरम्यान भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या याने खिलाडूवृत्ती दाखवली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कृणालने दाखवली खिलाडूवृत्ती
क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखले जाते. श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात याची प्रचिती सर्वांना आली. श्रीलंकेच्या डावातील २२ वे षटक भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या याने टाकले. षटकातील दुसरा चेंडू धनंजय डी सिल्वा याने कृणालच्या दिशेने मारला. त्याने तो अडवला मात्र यादरम्यान त्याचा धक्का नॉन स्ट्राइकला असलेल्या चरिथ असलंका याला लागला.

त्यानंतर कृणाल त्वरेने उभा राहिला व त्याने असलंका याला मिठी मारली. त्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले. या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

https://twitter.com/SonySportsIndia/status/1416742178865303554?s=19

श्रीलंकेची सन्मानजनक धावसंख्या
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद २६२ अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी ४९ धावांची सलामी दिली. पदार्पण करणाऱ्या भानु का राजपक्षे याने २४ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर मात्र भारतीय फिरकीपटूंनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.

युजवेंद्र चहल, कुलदीप यादव व कृणाल पंड्या यांनी मिळून ५ बळी घेत श्रीलंकेला संकटात टाकण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या तीन षटकात चमिका करूणारत्ने व दुष्मंता चमिरा यांनी काही मोठे फटके लगावत संघाला २६२ पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी कुलदीप यादव, युजवेंद्र चहल व दीपक चाहर यांनी प्रत्येकी दोन तर, कृणाल पंड्या व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक बळी आपल्या नावे केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

टाॅस झाला अन् सुर्याकुमारने चाळीस वर्षापुर्वी मुंबईकरानेच केलेल्या विक्रमाची केली बरोबरी

‘कुटुंबात तुमचे स्वागत’, राहुल द्रविडकडून ‘पदार्पणवीर’ सूर्यकुमार आणि इशान किशनला खास शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल

वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात ‘हा’ संघ आहे अव्वल, पाहा टीम इंडिया आहे कोणत्या नंबरवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---