---Advertisement---

‘कुटुंबात तुमचे स्वागत’, राहुल द्रविडकडून ‘पदार्पणवीर’ सूर्यकुमार आणि इशान किशनला खास शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, जुलै 18, 2021 8:19 PM
---Advertisement---

कोलंबो। आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची वनडे मालिका रविवारपासून सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातून भारताकडून इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंनी वनडे पदार्पण केले. वनडेत पदार्पण करणारे ते भारताचे अनुक्रमे २३५ आणि २३६ वे खेळाडू ठरले आहेत.

संजू सॅमसनला दुखापत झालेली असल्याने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली. त्यामुळे आता इशान आणि सूर्यकुमारला आपली प्रतिभा दाखवत अगामी टी२० विश्वचषकासाठी दावेदारी ठोकण्याची संधी आहे.

द्रविडने दिल्या शुभेच्छा 
पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी सूर्यकुमार आणि इशानला त्यांच्या वनडे पदार्पणाची कॅप प्रदान करण्यात आली. या कॅप प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.

द्रविड म्हणाला, ‘हे नक्कीच मोठे यश आहे. कुटुंबात दोन खेळाडूंचे स्वागत करण्यात आनंद होत आहे. या दोन खेळाडूंनी आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.’ या क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

इशान किशनला २३५ क्रमांकाची कॅप भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवनच्या हस्ते देण्यात आली. तर सूर्यकुमारला उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने २३६ क्रमांकाची पदार्पणाची कॅप दिली.

वाढदिवसाचे मिळाले खास गिफ्ट – 
इशान किशन रविवारी(१८ जुलै) त्याचा २३ वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी त्याने वनडे पदार्पण केल्याने हा दिवस त्याच्यासाठी आणखी खास बनला. तसेच वाढदिवसाच्या दिवशी वनडे पदार्पण करण्याचा मान मिळणारा तो भारताचा दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी गुर्शरन सिंग यांनी त्यांच्या २७ व्या वाढदिवशी भारताकडून वनडे पदार्पण केले होते.

श्रीलंकेचे भारताला २६३ धावांचे आव्हान
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा केल्या. त्यांच्याकडून चमिका करुणारत्नेने  १ चौकार आणि २ षटकारांसह ३५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. तसेच चरिथ असलंकाने ३८ आणि कर्णधार दसून शनकाने ३९ धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात ‘हा’ संघ आहे अव्वल, पाहा टीम इंडिया आहे कोणत्या नंबरवर

इशान किशनला वाढदिवसाचे मिळाले खास गिफ्ट! वनडे पदार्पणासह ‘हा’ विक्रमही झाला नावावर

Tokyo Olympics: भारताची पहिली तुकडी पोहचली टोकियोमध्ये दाखल; खेळाडूंचे झाले भव्य स्वागत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---