कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवार (१८ जुलै) पासून ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका आर प्रमदासा स्टेडियमवर खेळवली जात असून भारताकडून पहिल्या सामन्यातून दोन खेळाडूंचे वनडे पदार्पण झाले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने वनडे पदार्पण केल आहे. याबरोबरच इशानच्या नावावर एक खास विक्रमही झाला आहे.
वाढदिवसाचे मिळाले खास गिफ्ट –
इशान किशन रविवारी त्याचा २३ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्याच्या त्याच्या या वाढदिवसाचे खास गिफ्ट मिळाले. तो भारताकडून वनडे पदार्पण करणारा २३५ वा खेळाडू ठरला. यासह, वाढदिवसाच्या दिवशी वनडे पदार्पण करण्याचा मान मिळणारा तो भारताचा दुसराच खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी गुर्शरन सिंग यांनी त्यांच्या २७ व्या वाढदिवशी भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १९६३ रोजी झाला होता आणि त्यांनी ८ मार्च १९९० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅमिल्टन येथे वनडे पदार्पण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हा एकमेव वनडे सामना खेळला आहे. (Ishan Kishan is the second Indian player to make his ODI debut on his birthday)
इशान किशनची कारकिर्द –
पटना येथे १८ जुलै १९९८ रोजी जन्मलेला इशान देशांतर्गत क्रिकेट झारखंडकडून खेळतो. त्याने आत्तापर्यंत ४४ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून यात ५ शतके आणि ५५ अर्धशतकांसह २६६५ धावा केल्या आहेत. २७३ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तसेच त्याने ७७ अ दर्जाचे सामने खेळले असून यात त्याने २५४९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४ शतकांचा आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्याने १०२ टी२० क्रिकेट प्रकारातील सामनेही खेळले असून २ शतकांसह २५०५ धावा केल्या आहेत.
त्याने याचवर्षी १४ मार्च रोजी इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १ अर्धशतकासह ६० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत खेळतोय आपल्या त्रिमूर्तीविना; तब्बल सहा वर्षानंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडलीये ‘ही’ गोष्ट
संजू सॅमसनच्या पदार्पणाची चर्चा असूनही इशान किशनला का मिळाली संधी? कारण आले पुढे






