जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण किंवा क्षेत्ररक्षण यामध्ये आपले 100 टक्के योगदान देतो, तेव्हा सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू होते. कधीकधी या सर्वांमध्ये त्याची खेळाडूची इतर दिग्गज खेळाडूंसोबतही तुलना केली जाते. मात्र, काही खेळाडूंना हे आवडत नाही, तर काहीजण याकडे सकारात्मकतेने पाहतात. असाच एक युवा भारतीय खेळाडू आहे, ज्याने त्याची एमएस धोनी याच्याशी केलेली तुलना सकारात्मकतेने घेतल्याचे सांगितले. तो खेळाडू इतर कुणी नसून यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आहे. नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या वनडेत क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक झळकावले होते.
किशनचे धोनीशी तुलनेबद्दल भाष्य
माध्यमांशी बोलताना ईशान किशन (Ishan Kishan) याने म्हटले की, “मला गिलख्रिस्टची फलंदाजी आणि यष्टीरक्षक आवडते. मात्र, धोनी भाईला मी मैदानात आणि बाहेर पाहिले आहे. ज्याप्रकारे तो त्याची धैर्य कायम ठेवतो आणि सर्वांशी भेटतो, या गोष्टीही आयुष्यात महत्त्वाच्या ठरतात. एक मोठा खेळाडू कशाप्रकारे या गोष्टी हाताळतो आणि काय करतो, या सर्व मी माही भाईमध्ये पाहिल्या आहेत. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे.”
पुढे बोलताना किशन असेही म्हणाला की, “धोनी भाईशी झालेली माझी तुलना मी सकारात्मकतेने घेतो. जर लोक माझी तुलना एमएस धोनीशी करत आहेत, तर याचा अर्थ असा की, माझ्यात काहीतरी आहे. त्यामुळे मला त्यांच्या जागी पाहण्याची लोकांची इच्छा आहे. जर मी देशासाठी त्यांनी केलेली कामे 70 टक्के करू शकलो, तर मला फार आनंद होईल. त्यांनी खूप काही केले आहे. कितीतरी वनडे सामने संघाला जिंकून दिले आहेत.”
विशेष म्हणजे, बांगलादेशमध्ये ईशान किशन याचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले होते. त्याने वादळी फलंदाजी करत वनडे इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक झळकावले होते. त्याने बांगलादेशविरुद्ध 131 चेंडूंचा सामना करत 210 धावा चोपल्या होत्या. या खेळीनंतर सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. आता भारतीय संघ जानेवारी महिन्यात आपल्याच देशात श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Ishan Kishan on comparison with MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! डेविड वॉर्नरने शंभराव्या कसोटीत झळकावली डबल सेंच्युरी, भीम पराक्रम केला नावावर
आयपीएल 2023 लिलावात 17.50 कोटी मिळवणाऱ्या खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो…’