मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 मध्ये काही चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. त्याला प्रत्येक सामन्यात ट्रोल केलं जात आहे. याला अनुसरुन मुंबईचा सलामी फलंदाज ईशान किशन यानं वक्तव्य केलं आहे.
हार्दिक पांड्या जेव्हापासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हापासून त्याला काही चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. रोहित शर्माला कर्णधार पदावरुन काढून हार्दिकला कर्णधार बनवणं चाहत्यांना अजूनही मान्य नाही. पहिल्या काही सामन्यात सलग पराभव झाल्यामुळे त्याच्यावर अजूनच टीका होऊ लागली.
हार्दिक पांड्या करणार स्वत:ला सिद्ध – ईशान किशन
आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा सामना झाल्यानंतर ईशाननं सांगितलं की, “हार्दिक पांड्या नेहमी आव्हानाला सामोरे जातो. ज्याची त्याची इच्छा असते आणि आशा असते, त्यामुळे आपणं चाहत्यांच्या तक्रारीबाबत काहीही करु शकत नाही. परंतु मी जितकं हार्दिकला ओळखतो, त्यानुसार त्याला आव्हानांचा सामना करायला आवडतं. काही चाहते जे त्याच्याविषयी बोलतं आहे आणि जे काही करत आहेत त्यानं तो खूश आहे. येणाऱ्या सामन्यांमध्ये तो त्याच्या फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करेल आणि हेच चाहते परत एकदा त्याला पसंत करु लागतील. चाहते तुमच्या परिश्रमाची जाण ठेवतात. ते तुमच्यावर टीक करतील, परंतु जर तुम्ही स्वत: ला सिद्ध केलं तर आज नाहीतर उद्या सपोर्ट करणारचं आहेत.”
आयपीएल 2024 च्या 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीसनं 61 धावांची चांगली खेळी खेळली. रजत पाटीदारनं 50 आणि दिनेश कार्तिकनं 53 धावा केल्या. यांच्या जोरावर आरसीबीला 8 विकेट्स गमावून 196 धावांची मजल मारता आली.
प्रत्युत्तरात, मुंबईसाठी ईशान किशननं 69 धावा, रोहित शर्मा 38 धावा, सूर्यकुमार यादव 52 धावा केल्या, आणि मुंबई इंडियन्सनं 3 विकेट्स गमावून 15.3 षटकांत एकतर्फी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या
निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची गुगली! टीम इंडियातील भवितव्याबद्दल म्हणाला…
आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO
आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO