सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. वनडे मालिका पार पडल्यानंतर उभय संघांमध्ये आता कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावणारा भारताचा युवा फलंदाज ईशान किशन याला या क्रमवारीत मोठा फायदा झाला. तसेच, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला वनडे क्रमवारीत व ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन याला कसोटी क्रमवारीत लाभ झाला.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ईशान याला विश्रांती देण्यात आलेली. मात्र, तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात त्याने विश्वविक्रमी 210 धावांची खेळी केली. या द्विशतकामुळे त्याने वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी मजल मारली. त्याने थेट 117 धावांची उडी घेत 37 वे स्थान पटकावले. याच सामन्यात तब्बल तीन वर्षाच्या कालावधीनंतर वनडे शतक झळकावणाऱ्या विराट कोहली याला दोन स्थानांचा फायदा झाला. तो आता आठव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. तसेच, या मालिकेत एक अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर पाच स्थानांच्या प्रगतीसह 15 व्या स्थानावर पोहोचला.
याच मालिकेत भारतासाठी मोहम्मद सिराज हा प्रमुख गोलंदाज म्हणून खेळत होता. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. चार स्थानांच्या प्रगतीसह आता तो 22 व्या स्थानी आला आहे. त्याचवेळी बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत आठव्या तर, मालिकावीर पुरस्कार मिळवलेला मेहदी हसन मिराज कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसऱ्या स्थानी विराजमान झाला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतके व एक द्विशतक झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन याने आपले अव्वल स्थान मजबूत केले. त्याने आपलाच संघ सहकारी स्टीव्ह स्मिथ याच्यावर तब्बल 62 गुणांची मोठी आघाडी घेतली आहे.
(Ishan Kishan Reached Highest ODI Rankings)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?