युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर झालेल्या पहिल्या भेटीबद्दलची आठवण सांगितली आहे. इशान २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. तसेच सचिन पहिल्या आयपीएल मोसमापासून २०१३ पर्यंत खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्यानंतर तो त्या संघात मार्गदर्शक म्हणून जोडला गेला.
इशान सचिनला मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रावेळी पहिल्यांदा भेटला होता. याबद्दल क्रिकबझच्या स्पायसी पिच या शोमध्ये बोलताना किशन म्हणाला, ‘मला अजून पण आठवते माझ्यासाठी सर्वात उत्सुकतेचा क्षण तो होता जेव्हा मी सचिन पाजीला पाहिले होते. माझी मुंबई इंडियन्समध्ये निवड झाल्यानंतर माझा तो पहिला सराव सत्र होता. त्यावेळी सचिन तिथे आला होता.’
‘मी रोहित शर्माबरोबर बोलत होतो. तेव्हा मी रोहितला सांगितले की मी सचिन पाजीची पुजा करतो आणि आता ते समोर आहेत. काय करु मी. त्यावेळी रोहितने सांगितले की जा आणि बोल. पण सचिन पाजी स्वत:च आले आणि माझ्याशी बोलले. पण मला वाटत नाही की ते जे काही बोलले ते मी काही ऐकले कारण मी फक्त त्यांना बोलताना पाहत होतो.’
इशान हा आक्रमक फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून २१ सामने खेळले. यात त्याने ३७६ धावा केल्या. तसेच त्याने १४ डावात यष्टीरक्षण करताना ११ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं! असं बोलल्याचा सेहवागचा हा दावा आहे खोटा, कारण…
या दोन खेळाडूंना वाटतं, बीसीसीआयने परदेशातील लीग खेळू द्याव्यात
मोकळ्या स्टेडियमवर क्रिकेटचे सामने घ्यायचे का? विराट म्हणतो…