ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो टिक-टॉक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरदेेखील आपला फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. याव्यतिरिक्त वॉर्नर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवादही साधत आहे.
आयपीएलमधील आपला फ्रंचायझी संघ सनरायजर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) शनिवारी (९ मे) एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये वॉर्नर (David Warner) आपल्या कुटुंबासमवेत एका प्रसिद्ध तमिळ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यापूर्वी तो दाक्षिणात्य स्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘बुट्टबम्मा’ या तेलुगू गाण्यावरही थिरकला आहे.
https://www.instagram.com/p/B_9cbRtDuqV/?utm_source=ig_web_copy_link
वॉर्नरने परिवाराबरोबर ‘इंजि इदुपाजहागा’ या गाण्यावर डान्स केला. या गाण्याला महान संगीतकार इलैयाराजा यांनी संगीत दिले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक कमल हसनने हे गाणे गायले आहे.
वॉर्नरने ज्या गाण्यावर डान्स केला, ते गाणे इंस्ट्रूमेंटल (Instrumental) वर्जन होते. वॉर्नरबरोबर या व्हिडिओत त्याची पत्नी कॅंडिस वॉर्नर आणि मुलगी इंडी रेईदेखील आहे. वॉर्नरने एक कापड दक्षिण भारतीय लुंगीप्रमाणे कमरेवर बांधले आहे.
हा व्हिडिओ शेअर करत वॉर्नरने लिहिले की, “आम्ही परत आलो आहोत.” त्याने इतरांनाही अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचे चॅलेंज दिले आहे. वॉर्नरच्या या व्हिडिओला अनेक चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
https://www.instagram.com/p/B_8xsoyJRkj/?utm_source=ig_web_copy_link
एका चाहत्याने कमेंट केली की, “तुम्हाला तमिळनाडूकडून खूप खूप प्रेम.” तसेच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “तुम्हाला आता भारतीय नागरिकत्वाची आवश्यकता आहे. आम्हाला तुम्ही खूप आवडता.” तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, “शेवटी तुम्ही तमिळ गाण्यावर डान्स केला आणि तो सर्वांना आवडला देखील.”
यापुर्वी एबी डिविलियर्सलाही भारताचे नागरिकत्त्व द्यावे, अशी मागणी चाहत्यांनी केली होती.
वॉर्नरवर आयपीएल २०२०मध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविली आहे. परंतु असे असले तरी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
त्याने आयपीएलमध्ये एकूण १२६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४३.१७ च्या सरासरीने ४७०६ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १८१ षटकार आणि ४५८ चौकार ठोकले आहेत. यादरम्यान त्याचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट १४२.३९ इतका आहे.
त्याने मागील वर्षी १२ सामन्यांमध्ये ६९.२० च्या सरासरीने एकूण ६९२ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं! असं बोलल्याचा सेहवागचा हा दावा आहे खोटा, कारण…
-या दोन खेळाडूंना वाटतं, बीसीसीआयने परदेशातील लीग खेळू द्याव्यात






